Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»भोंदू बाबा खरात प्रकरणी बुडत्याचा पाय खोलात!
    संपादकीय

    भोंदू बाबा खरात प्रकरणी बुडत्याचा पाय खोलात!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2026No Comments378 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    भोंदू बाबा खरातला आज पुन्हा एका गुन्ह्यात 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली. आता आणखी काही गुन्हे म्हणजे 11 अधिक 8 असे 19 गुन्हे खरात वर दाखल झाले आहेत. खरातच्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध होते. अनेक राजकीय बड्या नेत्यांसोबत खराचे संबंध होते. त्यामुळे तो आतापर्यंत कुठल्याच गुन्ह्यात गेल्या 18 वर्षात कधी सापडला नाही. परंतु राजकीय षडयंतत्रामागे का होईना खरात वर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आणि खराची उलटी गिनती सुरू झाली. 18 मार्चला त्याला शिताफीने अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या तारखांवर तारखा चालू आहेत. एका गुन्ह्यातून दुसऱ्या गुन्ह्यात, दुसऱ्या गुन्ह्यातून पुन्हा तिसऱ्या गुन्ह्यात असे आता एकूण 19 गुन्ह्यांची मालिका अशोक खरात वर आहे. त्यामुळे बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात तशातला प्रकार खरात सोबत झाला आहे. आता या गुन्ह्यांच्या मालिकेतून आपली सुटका नाही, म्हणून तो म्हणतोय ‘माझ्या मुलाला माझ्याबरोबर आणा. त्याला काही महत्त्वाचे सांगायचे आहे. यापुढे जीवन कसे जगले पाहिजे याबाबत त्याला सूचना द्यायच्या आहेत.’ भोंदू बाबा खरात याची ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे. नाशिक, अहमदनगर, शिर्डी, सिन्नर येथील 11 ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या आहेत. त्यातून फार मोठे घबाड ईडीला हाती लागले आहे. सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिर परिसरात धाड टाकली. नाशिक येथील त्याच्या राहत्या बंगल्यावर धाड टाकण्यात आली. सर्व ठिकाणी बेनामी संपत्ती ईडीला आढळून आली आहे. शिर्डी पोलिसांनी त्यांच्या समता पतपेढी संदर्भात चौकशी सुरू केली असून यामध्ये कोट्यावधीची बेनामी खाती आढळून आली आहेत. समता पतपेढीमध्ये रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शिर्डी पोलिसांनी त्यांना खास समन्स पाठवून चौकशी केली. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांच्या नावे असलेल्या खरातच्या 2 कोटी 20 लाख रुपये आढळून आले. ते 2 कोटी 20 लाख रुपये प्रकरणी प्रतिभा चाकणकर म्हणतात, ‘माझ्या नावाने कुणीतरी बनावट खाते उघडून हा गैरव्यवहार केला आहे.’ प्रतिभा चाकणकरांसोबत त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर हा देखील होता. तेव्हा 2 कोटी 20 लाख रुपये खाते प्रकरणात अशोक खरात हाच नॉमिनी आहे. तेव्हा मला या प्रकरणी काहीच माहिती नाही, असे प्रतिभा चाकणकर यांनी सांगणे म्हणजे हे एक प्रकारे हास्यास्पदच म्हटले पाहिजे. एखाद्या समता पतपेढी 2 कोटी 20 लाखांचे बेनामी खाते प्रतिभा चाकणकरांच्या नावे उघडले जावे आणि त्या प्रकरणी मला काहीच माहित नाही, बनावट कागदपत्रांच्या आधारे हे खाते उघडण्यात आले आहे, असा दावा करणे हे प्रतिभा चाकणकर यांना अशोभनीय आहे. इकडे प्रतिभा चाकणकर त्यांच्या भगिनी दुसऱ्या गुन्ह्यात बसून जप करीत आहेत की, “मी त्यातली नाही..” अशा या दोन्ही भगिनींनी अकलेचे तारे तोडले आहेत. प्रतिभा चाकणकरांपेक्षा रूपाली चाकणकर यांचा पाय पूर्णपणे रुतला असून ‘मी त्यातली नाही’ असे म्हणणे कितपत शोभते? कारण ईशानेश्वर ट्रस्टवर ट्रस्टी असणाऱ्या रूपाली चाकणकरांना खरात प्रकरणातील काहीच गोष्टी माहित नाही, असे म्हणणे कितपत योग्य आहे?

     

    या प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीकडून त्यांच्या परीने चौकशी सुरू आहे. एसआयटी त्यांचं काय करत आहे? जोपर्यंत ठोस पुरावा एसआयटीकडे येणार नाही तोपर्यंत एसआयटी कुणालाही हात लावणार नाही. या प्रकरणी रूपाली ठोंबरे पाटील या म्हणतात की, ‘रूपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष असून सुद्धा काही महिलांच्या तक्रारींची दखल त्यांनी घेतली नाही. रूपाली चाकणकर या ईशानेश्वर ट्रस्टच्या सदस्यच असून त्यांचा आर्थिक व्यवहार खराब बरोबर झाला आहे. त्याकरिता रूपाली चाकणकरांना सह आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे,’ अशी मागणी केली आहे. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी आणखी पुरावे सादर करून रूपाली चाकणकरांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. रूपाली चाकणकर माजी मंत्री दीपक केसरकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदी आदींविषयी पुरावे सादर केले आहेत. याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी अशोक खरात बरोबर कोणाची संबंध होते, त्यांचे फोन कॉल रेकॉर्डिंग सादर केलेले आहेत. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल अशोक खराब बरोबर झाले आहेत. रूपाली चाकणकरांचे 178 कॉल रेकॉर्ड झाले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे 17 कॉल खरात बरोबर झाले आहेत. इतर आयपीएस अधिकारी, आयएएस अधिकारी यांच्या बरोबरही खराचे कॉल रेकॉर्ड झाले आहेत. अंजली दमानिया यांनी कॉल रेकॉर्डचा बॉम्ब टाकला आहे. तिकडे तृप्ती देसाई या सामाजिक कार्यकर्ता यांनी नीलम गोऱ्हे यांच्या बरोबर अशोक खरातचे संबंध उघडकीस आणले आहेत. त्यामुळे नीलम गोऱ्हे सुद्धा यातून सुटलेल्या नाहीत. तसेच तृप्ती देसाई म्हणतात, या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश होणार म्हणून भोंदू बाबा अशोक खरात याचा एन्काऊंटर होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्याचा इन्काऊंटर होणार अशी शक्यता खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील व्यक्त केली आहे. अशा प्रकारे भोंदू अशोक खरात प्रकरणी बुडत्याचा पाय खोलात जात असल्याचे बोलले जात आहे..!

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!

    May 13, 2026

    इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाह सोहळा!

    May 7, 2026

    विजय थलपती यांच्या शपथविधीची जोरदार तयारी!

    May 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif