रिलीज होण्याआधीच ‘भोला’ चित्रपटाने केली इतकी कमाई…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

अजय देवगण (Ajay Devgn) पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांसाठी बिग बजेट सिनेमा घेऊन येत आहे. त्याचा ‘भोला’ (Bhola) चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यापासून लोक तब्बू आणि अजय देवगण स्टारर चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. ‘भोला’च्या रिलीजला आता एक आठवडा बाकी आहे, पण लोकांमध्ये या अॅक्शन चित्रपटाची किती क्रेझ आहे, याचा अंदाज या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग आणि त्याची कमाई पाहूनच लावता येईल. इतकंच नाही तर सिनेमागृहेही जवळपास तुडुंब भरली आहेत.

अजय देवगणही भोलाबाबत खूप उत्सुक आहे. या चित्रपटात तो केवळ अभिनय करतांना दिसणार नाही, तर त्याने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. अजय देवगणचा भोला हा तमिळ चित्रपट ‘कैथी’ चा हिंदी रिमेक आहे. भोलाने अॅडव्हान्स बुकिंगमधून तीन दिवसांत सुमारे 1 कोटींची बंपर कमाई केली आहे. भोलाच्या तिकिटांची ज्या पद्धतीने विक्री होत आहे, ते पाहता अजय देवगणचा चित्रपट पहिल्याच दिवशी डबल डिजिटसोबत ओपनिंग करू शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.