Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»अखेर भीमराव कांबळेला फाशी : कोर्टाचा निकाल
    ब्रेकिंग

    अखेर भीमराव कांबळेला फाशी : कोर्टाचा निकाल

    नरसापूर प्रकरणात चिमुकलीला मिळाला न्याय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026No Comments401 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यातील भोर तालुक्यामधील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. आरोपी भीमराव कांबळे याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले आहे. 1 मे 2026 रोजी आरोपीने हा क्रूर गुन्हा केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज देखील पुढे आले. ज्यात आरोपी भीमराव कांबळे हा चिमुकलीला हाताल धरून घेऊन जाताना स्पष्ट दिसले.

    दरम्यान आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला. त्याच्या कुटुंबियांनी देखील त्याला कडक शासन व्हावे, अशी मागणी केली. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला होता. चिमुकलीचा शेणाच्या ढिगाऱ्यात मृतदेह लपवला होता. सीसीटीव्ही आधारे आरोपी भीमराव कांबळे याला पकडण्यात आले होते. कोर्टाने मागच्या सुनावणीत भीमराव कांबळे याला दोषी ठरवले. मात्र, त्याचा निकाल 29 जून रोजी राखीव ठेवला. अखेर या प्रकरणातील निकाल पुढे आला.

    कोर्टाने आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन्ही बाजूचा निकाल कोर्टाने ऐकून घेतला, असल्याचे न्यायालयाने म्हटले. यादरम्यान न्यायाधीशांनी घटनांचा दाखला दिला. घटना किती जास्त क्रूर आहे, हे समजून घ्यावे लागेल असे न्यायाधिशांनी सुनावणी दरम्यान म्हटले. यादरम्यान कोर्टाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त बघायला मिळत आहे.

    आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी केली होती. कोर्टात चिमुकलीचे आई वडील उपस्थित होते. आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंड की, जन्मठेप सुनावणार यावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, अखेर कोर्टाने नुकताच याबाबत निकाल दिला आहे. आरोपीने आपला गुन्हा देखील मान्य केला.

    दोन्ही बाजूंचे निकाल ऐकून घेतल्यानंतर कोर्ट शिक्षेपर्यंत पोहोचत असल्याचे न्यायाधिशांनी म्हटले. या प्रकरणानंतर राज्यभरात मोर्चे निघाले, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात होती. कुटुंबियांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातील अनेक बडे नेते चिमुकलीच्या कुटुंबियांच्या भेटीला पोहोचले होते. केसच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडून अनेक केसचे दाखले देण्यात आली. अनेक प्रकरणांमध्ये आरोपींना फाशीचा शिक्षा झाल्याचे कोर्टाने नमूद केले. आरोपी विरोधात सबळ पुरावे असल्याचे कोर्टाने नमूद केले. शेवटी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कोर्टाने सुनावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif