‘भेडिया’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; कमावले ‘इतके’ कोटी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कांतारा’ (Kantara) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. त्यांनतर वरूण धवनच्या (Varun Dhawan) ‘भेडिया’ने (Bhediya) बॉक्स ऑफिसवर (box office) धुमाकूळ घातला आहे.

वरूण धवन, क्रिती सॅनन (Kriti Sanon), अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘भेडिया’ गेल्या शुक्रवारी रिलीज झाला आणि दोन दिवसांत या सिनेमाने 25 कोटींचा गल्ला जमवला.

भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘भेडिया’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 7.48 कोटींची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी 9.57 कोटींचा गल्ला जमवला. आत्तापर्यंत या चित्रपटाने 17.05 कोटींचा बिझनेस केला आहे. वर्ल्डवाईड या चित्रपटाने दोन दिवसांत 26.66 कोटींचा वर्ल्डवाईड ग्रॉस बिझनेस केला आहे.

असा आहे चित्रपट
भास्कर शर्माची ही कथा आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये जंगलातून रस्ता काढण्यासाठी गावकऱ्यांकडून जमिन अधिग्रहित करण्याचं कॉन्ट्रॅक्ट भास्करला मिळतं. त्यासाठी तो वडीलोपार्जित घरही गहाण टाकतो. चुलत भावासोबत हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचतो. एका वळणावर एक लांडगा भास्करच्या मागे लागतो. भास्कर झाडाला लटकतो, पण लांडगा त्याच्या पार्श्वभागाचा लचका तोडतो. उपचारांसाठी भास्करला जनावरांची डॉक्टर असलेल्या अनिकाकडे आणलं जातं. ती उपचार करते आणि दुसऱ्या दिवशी भास्करची जखम बरी होते. गावकऱ्यांची मिटींग घेऊन भास्कर रस्त्याचं प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवतो, पण गावकरी भडकतात. भास्कर तरुणांच्या लीडरशी हातमिळवणी करून त्यांच्या सह्या घेतो. त्यानंतर अशा काही घटना घडत जातात ज्या आकलना पलीकडल्या असतात.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here