भवरलालजींनी शेती, शेतकरी विकासाच्या माध्यमातून जग बदलण्याचे कार्य केले !

डॉ. पार्थ घोष यांचे प्रतिपादन : ‘भाऊंच्या कट्ट्या’मध्ये जळगाकरांशी संवाद

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

परिसंस्थेमध्ये (इको सिस्टिम्स्‌) जगात बदल घडविण्याची शक्ती आहे. आज जगाला याच गोष्टींची आवश्यकता आहे. जैन हिल्स येथे भवरलालजी जैन यांनी दूरदृष्टीतून इको सिस्टिम्स विकसीत केली. पर्यावरण, शेती आणि शेतकरी विकासाचे केलेले कार्य पाहून मी थक्क झालो. असे गौरोद्गार आंतरराष्ट्रीय पातळीवरील नीति सल्लागार, रणनीतिकार, मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी काढले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टिम्स्‌ लि., भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमांतर्गत कस्तुरबा सभागृह जैन हिल्स येथे कार्यक्रम आयोजला होता. यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन व्यासपीठावर उपस्थित होते. स्व.मोठ्याभाऊंनी जैन हिल्स येथील इको सिस्टिम्स्‌चे कार्य उभारत असताना हॅण्ड, हार्ट आणि हेड या तीन ‘एच’ चा चपखल उपयोग करून घेतलेला दिसत आहे. प्रेरणा, स्थिरीकरण, सक्रियीकरण, अंतर्ज्ञान, संश्लेषण, नाविण्यपूर्ण वेगळेपण आणि शिक्षण या सात गोष्टींची जोड देखील अत्यंत चांगल्या पद्धतीने देण्यात आलेली आहे हे प्रकर्षाने जाणवते. शेती हे क्षेत्र औद्योगिक व आर्थिक उन्नतीचे हृदय आहे. यावर जैन इरिगेशनच्या माध्यमातून भवरलाल जैन यांनी मोठे कार्य केले. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत परिवर्तन घडवून आणले, असे विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरील मॅनेजमेंट गुरू डॉ. पार्थ घोष यांनी व्यक्त केले.

‘why is a philosophical base key to creating sustainable enterprise’ या विषयावर शहरातील निमंत्रीत व्यक्तींसाठी ‘भाऊंचा कट्टा’ या उपक्रमात जागतिक किर्तीचे व्यक्तीमत्त्व डॉ. पार्थ घोष यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन झाले. प्रास्ताविक उपाध्यक्ष अनिल जैन यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुब्रम्हण्यम यांनी तर आभार प्रदर्शन अतुल जैन यांनी केले.

 

भवरलाल जैन यांची दूरदृष्टी प्रेरणादायी

डॉ. पार्थ घोष यांनी स्व.भवरलाल जैन यांच्या दूरदृष्टी संदर्भात विवेचन केले. पर्यावरणपूरक उद्योगाची निर्मिती करून सर्वसमावेश स्थिरता आणण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये प्रेरणा, स्थिरता, क्रियाशीलता, उभारणी, संश्लेषण, शिक्षण याचा समावेश दिसतो. तो चिरंतर आहे. त्यासाठी त्यांनी खालील मुद्दांवर विवेचन केले.

 

शैक्षणिक क्षेत्रातील बदलांची गरज

डॉ. पार्थ घोष यांनी शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदलांची आवश्यकता अधोरेखित केली. आजच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याबाबत त्यांनी सांगितले. याच जोडीला महाविद्यालयीन स्तरावर शाश्वत विकासासाठी उद्योजकीय शिक्षणाचा समावेश करण्यात यावा आणि जागतिक बदल घडविणारी पर्यावरण पद्धती (इको सिस्टिम) उभारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळेच सामाजिक मूल्य आणि शाश्वतेला प्राधान्य देऊन नैतिकेतून विकास साधता येऊ शकतो याबाबत देखील त्यांनी प्रकाश झोत टाकला. उपस्थितांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.