Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»भवानी माता मंदिर परिसराला मिळणार भव्य रूप
    महाराष्ट्र

    भवानी माता मंदिर परिसराला मिळणार भव्य रूप

    आ. करण देवतळे यांचा पुढाकार : २ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 18, 2026No Comments350 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भद्रावती, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील प्राचीन आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भवानी माता मंदिर परिसराच्या सौंदर्यीकरण व विकासकामांचा भूमिपूजन सोहळा सोमवार, दि. 18 मे 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सदर विकासकामांचे भूमिपूजन आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामामुळे परिसराला आकर्षक व भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे.

    यावेळी बोलताना आमदार करण देवतळे यांनी सांगितले की, भद्रावती शहराचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंदिर परिसराचा विकास अत्यंत आवश्यक आहे. भवानी माता मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त वातावरण उपलब्ध व्हावे, हा या विकासकामामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    या विकासकामांतर्गत मंदिर परिसराचे सुशोभीकरण, सी.सी. रोड बांधकाम, भव्य कमान गेट उभारणी तसेच विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    भूमिपूजन सोहळ्यास भवानी माता मंदिर समितीचे अध्यक्ष ईश्वर गौरकार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, संजय वासेकर, कुलते साहेब, अमित गुंडावार, नगरसेविका वृषाली पांढरे, इम्रान खान, किशोर गोवारदिपे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, स्थानिक मान्यवर, मंदिर समिती सदस्य, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. “जय भवानी माता”च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif