Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस
    ताज्या बातम्या

    विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 11, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

    महाविकास आघाडीचा निर्णय

    मुंबई वृत्तसंस्था

    नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाला विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक संख्याबळ मिळाले नाही. त्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस या पक्षांनी संयुक्तरित्या भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.

    यावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “महाविकास आघाडीने विरोधी पक्ष नेते पदासाठी माझ्या नावाची शिफारस केली आहे. अधिवेशन कमी दिवसांचे असल्यामुळे जर आता केवळ घोषणा झाली आणि पुढील अधिवेशनात नियुक्ती झाली, तरी लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित राहील.”यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षावरही टीका केली आणि लोकशाहीचे भान राखण्याचे आवाहन केले.

    विरोधी पक्ष नेते पदासाठी सुरुवातीला आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र, शेवटी अनुभवी नेते भास्कर जाधव यांच्यावर सर्वांचा एकमताने निर्णय झाला.काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी स्वतःला क्षमतेनुसार संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या शक्यतेच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी त्या शक्यता फेटाळून लावल्या होत्या.

    भास्कर जाधव यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आणि प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे.आता विधानसभेत विरोधकांची भूमिका कशी राहते आणि सत्ताधारी पक्ष यावर कसा प्रतिसाद देतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Bhaskar Jadhav Mahavikas Aghadi Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif