Sunday, November 27, 2022

धक्कादायक; भारतीय हवाई हद्दीत इराण-चीन विमानात बॉम्बची अफवा… वायुसेनेची करडी नजर…

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

तेहरानहून (Tehran) चीनला (China) जाणाऱ्या महान एअरच्या (Mahan Air) विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली. हे विमान दिल्लीच्या (Delhi Air Space) हवाई हद्दीत बराच काळ राहिले आणि यादरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानांनी त्यावर बारीक नजर ठेवली. बॉम्बच्या धमकीनंतर, इराणची राजधानी तेहरानहून चीनच्या ग्वांगझूला जाणारे महान एअरचे प्रवासी विमान थांबवण्यासाठी भारतीय हवाई दलाने आपली लढाऊ विमाने पाठवली. हवाई दलाने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली.

निवेदनानुसार, सकाळी विमान क्रमांक W-581 भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना ही घटना घडली. भारतीय लढाऊ विमानांनी सुरक्षित अंतरावर या उड्डाणाचा पाठपुरावा केला. “विमानाला प्रथम जयपूर आणि नंतर चंदीगड येथे उतरण्याचा पर्याय देण्यात आला. मात्र, पायलटने सांगितले की, त्याला दोन्ही विमानतळांवर विमान उतरवायचे नाही.

त्यात म्हटले आहे की, “3 ऑक्टोबर रोजी, एका इराणचे नोंदणीकृत विमान भारतीय हवाई हद्दीतून जात असताना बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने तात्काळ संबंधित उड्डाणाच्या दिशेने वळवण्यात आली, त्यांनी सुरक्षित अंतरावर त्याचा पाठलाग सुरू ठेवला.” काही काळानंतर, तेहरानकडून बॉम्बच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करण्याचा संदेश आला, त्यानंतर विमानाने आपल्या अंतिम गंतव्याच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला, असे निवेदनात म्हटले आहे.

“सर्व पावले भारतीय हवाई दलाने नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरो (बीसीएएस) सोबत संयुक्तपणे विहित प्रक्रियेनुसार उचलली,” असे निवेदनात म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की, इराणी विमान भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण करत असताना हवाई दलाच्या रडारच्या निगराणीखाली होते.

इराणी (Iran) विमान भारतीय हवाई हद्दीत असताना दिल्ली (Delhi) विमानतळाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) हवाई दलाच्या सतत संपर्कात होता. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने बॉम्बच्या कथित धमकीबाबत दिल्ली एटीसीला माहिती दिली होती.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या