पुण्यात ‘भारतीय छात्र संसदे’चे आयोजन

जिल्ह्यातील दीडशे विद्यार्थी सहभागी होणार : अनेक विषयांवर होणार विचार मंथन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ्फ गव्हर्नमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय 14 वी ‘भारतीय छात्र संसदे’चे दि.8 ते 10 फेब्रुवारी रोजी विवेकानंद सभामंडप, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड येथे होणार आहे. या संसदेत जिल्ह्यातील दीडशे विद्यार्थी सहभागी होतील अशी माहिती सिनेट सदस्य तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज पाटील, भारतीय छात्र संसदचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया, प्रितम शिंदे उपस्थित होते.

या छात्र संसदेचे उद्घाटन दि.8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होईल. केंद्रीय कामगार आणि रोजगार, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, सीएमओ बीओएटीचे सह संस्थापक अमन गुप्ता हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या प्रसंगी उत्तर प्रदेश विधानसभेचे सभापती सतीश महाना यांना आदर्श विधानसभा सभापती पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

दि. 10 रोजी दुपारी होणाऱ्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा.राम शिंदे, मध्यप्रदेश विधानसभेचे सभापती नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार आहेत.

छात्र संसदेच्या उद्घाटन व समारोप समारंभाखेरीज या छात्र संसदेमध्ये 4 सत्रे आयोजित केली गेली आहेत.  भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे, उजवीकडे की नजरेच्या बाहेर, रेवडी संस्कृती- एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार, भारतीय संस्कृती की पाश्चात्य ग्लॅमर भारतीय युवकांची कोंडी,

एआय आणि सोशल मिडिया सामर्थ्य की अनपेक्षित संकट याशिवाय लोकशाहीचा रंगमंच व विशेष ‘युथ टू युथ कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले आहे.

यांचा राहणार सहभाग

या छात्र संसदेत अवधेश नारायण सिंह, डॉ. कन्हैया कुमार, नवज्योतसिंग सिद्ध, खासदार राजकुमार रौत, विजयकुमार सिन्हा, रवींद्र नाथ महातो, पवन खेरा, तरूण चुघ, रणजीत रंजन, संजय सेठ, नंदकिशोर यादव, अरुण गोविल, अभिनेत्री खुशबू सुंदर, थॉमस ए. संगमा, के.टी. रामाराव, राजीव चंद्रशेखर, दिग्वीजय सिंग, ज्योतिरादित्य सिंधिया, मुरलीधर मोहोळ, ॲड. राहुल नार्वेकर, चंद्रकांत पाटील, पद्मभूषण सुमित्रा महाजन, शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, जस्टिस एन. संतोष हेगडे, डॉ. विजय भटकर आणि नानीक रुपानी हे मार्गदर्शक आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.