फुले पगडी घालताच राहुल गांधी म्हटले; ‘फेंटा’ नही सम्मान है महाराष्ट्र का, झुकने नही दुंगा…

0

 

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ ‘फेंटा’ नहीं है…सम्मान है महाराष्ट्र का, और इस सम्मान को मैं सदा सिर-आंखों पर रखूंगा…कभी झुकने नहीं दूंगा… असे व्टीट करुन त्या सत्काराला दाद दिली.

सेलचे प्रदेशाध्यक्ष माळी यांच्या सत्कारानंतर राहुल गांधींनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचारच देशाला वाचवू शकतात असे उद्गार काढले. माळी यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना व कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन या दोन प्रमुख मागण्या त्यांच्यापुढे मांडल्या. त्यावर गांधी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेनीफेस्टोमध्ये या दोन प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात येईल असे आश्वासन दिले.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा हिंगोली शहरात दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी स्वागत झाले. त्यानंतर शहरातील पार्वती टॉवर्स येथे त्यांनी अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी अ‌ॅड. सुरेश गडदे यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऍड. मनीषा गडदे , ऍड. विपीन अर्धापुरकर, अ‌ॅड. कवडे , अ‌ॅड. सचिन पोले, अ‌ॅड. दीपक लेकुळे, अ‌ॅड. कानबाराव मस्के, अ‌ॅड. बालाजी जगताप, गुनाराव पोले, कानिफनाथ दिंडे, कृष्णा डीजीटलचे गंगाधर लोंढे, संतोष लोंढे बाबुराव हराळे आदींची उपस्थिती होती.

आज राहुल गांधींनी हिंगोलीत चहा घेतला. ”बहुत दिनसे कितनी बढीया चाय नही मिली, आज चाय पिके बहुत अच्छा लगा.” असे म्हणत त्यांनी हॉटेलचालकाची स्तुती केली आणि त्यांना धन्यवादही दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.