vapor 4 life coupon tf2 gift wrap duplication glitch coupons for old navy online 2015 harbor freight torque wrench coupon 2013 blutvergiftung ursachen symptome park and go omaha coupon
Friday, December 2, 2022

भारत जोडो यात्रेवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपचे गोव्यात ‘ऑपरेशन चिखल’ – काँग्रेस

- Advertisement -

 

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

गोव्यात त्यांचे आठ आमदार भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर, काँग्रेसने बुधवारी आरोप केला की, भारत जोडो यात्रेच्या यशाने भाजप निराश झाला आहे आणि यात्रेवरून लक्ष वळवण्यासाठी ऑपरेशन चिखल सुरू केले आहे.

- Advertisement -

पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस भाजपच्या या ‘फालतू डावपेचांवर’ मात करेल.

भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशामुळे गोव्यात भाजपचे ‘ऑपरेशन चिखल’ राबविण्यात आले, असे ट्विट त्यांनी केले. दररोज लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होत असून, यात्रा कमकुवत वाटावी यासाठी हा अपप्रचार केला जात आहे.

काँग्रेसचे मीडिया आणि प्रसिद्धी प्रमुख पवन खेरा म्हणाले, फक्त भाजपच फोडू शकतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे.

गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी विधिमंडळ पक्षनेते मायकल लोबो यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या