Wednesday, August 10, 2022

प्रौढाची आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या

- Advertisement -

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

भालोद येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय प्रौढ व्यक्तीने आजाराला कंटाळून राहत्या घरातील वरच्या माजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

ललित जनार्दन परतणे (वय ४५, रा. चिखली दरवाजाजवळ, भालोद ता. यावल जि. जळगाव) असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ललित परतणे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांना दुर्धर आजार जडला होता. या आजारामुळे त्यांना शारीरिक त्रास होत होता. त्यामुळे रविवार १३ फेब्रुवारी रोजी ललित परतने यांनी राहत्या घरात असलेल्या पहिल्या मजल्यावर दोरीने छताच्या हुकाला बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीला आले.

नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस नाईक किरण चाटे करीत आहेत.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या