सावखेडा बु. येथे भैरवनाथ बाबा यात्रा उत्सवाला सुरूवात

दि. ५ जानेवारी पासून यात्रोत्सव : प्रत्येक रविवारी भरते यात्रा : राष्ट्रीय एकात्माता जपणारी तथा नवसाला पावणारी ४०० वर्षाची परंपरा

0

 

वरखेडी ता. पाचोरा

पाचोरा तालुक्यातील वरखेडी (विर मन्साराम दादाची) पासून ३ कि. मी अंतरावर दक्षिणेला सावखेडा येथील भैरवनाथ बाबा चा यात्रोत्सव दि. ५ जानेवारी पासून होत आहे. ही यात्रा दरवर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी भरते या वर्षी रोजी यात्रेचा २६ जानेवारी २०२५ शेवटचा दिवस आहे २७ सोमवार रोजी कुस्तीच्या दंगल व पालखी सोहळा संपन्न होतो.

सावखेडा येथील बहुला, उतवळा, खटकवाळा अश्या तीन नद्याच्या त्रिवेणी संगमावरच्या माळ रानावर निसर्गरम्य वातावरणात एकात्मतेची आदर्श पंरपरा लाभलेली जवळ जवळ ४०० वर्षा हून अधिकचा इतिहास लाभलेली भैरवनाथाची ही यात्रा तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते.

श्री क्षेत्र भैरवनाथ संस्थान येथील भागवत शास्त्र ह. भ. प संजीव महराज यांनी सांगितले की, सावखेडा येथील बहुला उतवळी व खटकाळ, नद्याच्या त्रीवणी संगमावर भगवान शंकर व विष्णू भगवंताची बहुळा नदीवर भेट झाली. त्यावेळी त्यात अष्ट भैरवशक्ती निर्माण झाली. त्यातील तिन भैरव सावखेडा येथे आहे. भस्मासुराचा वध झाल्या नंतर भगवान शंकर व माता पार्वती यांनी येथे येवून वरदान दिले आहे. येथे अंधश्रद्धा नष्ट होतात असे स्कंद वूरणात म्हटले आहे.

धार्मिक व आदर्श पंरपरा
सावखेडा येथील भैरवबा नवसाला पावणारा ईडा पिडा नष्ट करणारा सुख समृद्धी देणारा भैरवबा म्हणून भाविकांचे श्रद्धास्थान ठरला आहे.

नवसाची पंरपरा
भैरवबा दरबारात येथून नवस मानणे आणि ईच्छापूर्ती झाल्यावर यात्रे प्रसंगी अथवा इतर वेळी रविवार नवस फेडणे या श्रद्धेतून नवसाची पंरपरा जोसली जाते. वरणबटी वांग्याची भाजीचा नवस फेडला जातो.

गुळाचा नवस
भैरवबाबाला गुळाचाही नवस मानला जातो. गुळतुलाही केली जाते. सव्वा किलोपासून १ क्विटल पर्यतचा गुळाचा नवस मानून तो प्रसाद म्हणून वाटला जातो. वाद्य वाजवत भैरवबाला भोग (प्रसाद) चढविला जातो आणि नंतर प्रसाद व भोजन घेतले जाते.

बैलगाड्यांची प्रथा
खानदेशातील भाविक या यात्रोत्सवसाठी बैलगाडीने सहकुटुंबाने येतात. अनेक वर्षाची ही प्रथा जोपासली जात आहे. त्यामुळे यात्रे प्रसंगी शनिवार रात्रभर बैलाच्या पावलाचे आणि घुगराचे आवाज परिसरात निदतात.

इच्छा पूर्ण करणारा गोटा
भैरवबा मंदिरात काळ्या दगडाचा एक गोलकार गोटा आहे. मनोकामना पूर्ण करणारा गोटा म्हणून भाविकांची त्यावर श्रद्धा आहे.

विवाह विधी
यात्रे प्रसंगी अथवा इतर रविवारी गोरगरीब कुटूबीय येथेविवाह सोहळे पार पडतात. स्वपाकाची जागापाण्याची व राहण्याची सोय येथे असल्याने विवाहासाठी आलेली वऱ्हाडी मंडळी येथे २-३ दिवस थाबतात.

फुलोरा चढवण्याची प्रथा
भैरवबाच्या मंदिरात नारळ अथवा सांजोऱ्याचा फुलेरा चढविला जातो. लोकवर्गणीतून व संस्थांच्या संयोगातून मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. विवाह नवस यासाठी कोणताही निधी संदर्भात सक्ती संस्थाना तर्फे केली जात नाही. मंदिरात ३ पितळी मुर्त्याचे विलोभानीय भावमुडा भाविकांना मोहित करतात.

सर्वात मोठी यात्रा
सावखेडा बु तालुका पाचोरा येथील श्री भैरवनाथ बाबाची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा मानली जाते. यावर्षी पौष महिन्यातील प्रत्येक रविवार यात्रा पुढील प्रमाणे भरेल ०५ जानेवारी २०२५ पहिला रविवार, १२ जानेवारी दुसरा रविवार, १९ जानेवारी तिसरा रविवार, २६ जानेवारी २०२५ शेवटचा रविवार, २७ जानेवारी २०२५ सोमवारी कुस्ताची दंगल यात्रेनिमित्ताने संसारोपोयोगीभांडी वस्तू खेळणी लहान मोठे पाळेने मिठाई आदीची दुकाने थारण्यात येत आहेत.

पालखीची परंपरा
यात्रेचा शेवटचा रविवार २६ जानेवारीला असून २७ जानेवारी सोमवारी रोजी सकाळी ११ वादुपारी ४ भव्य कुस्ताचा कार्यक्रम होतो. ४ वाजेनतर सजवलेल्या रथामधून श्री भैरवनाथ बाबाच्या मंदिरातील तीनी ही पितळी मुर्त्याचे सह वाद्य वाजवत पालखीची मिरवणूक काढण्यात येते. ही मिरवणूक सावखेडा बु, सावखेडा खु, वरखेडी नु, भोकरी, वरखेडी खु, लासुरे या पंचक्रोशीततून रात्रभर भैरवनाथबाबाची पालखीची मिरवणूक काढली जाते.

या यात्रे साठी पाचोरा-जामनेर आगाराततुन विशेष गाड्या सोडण्यात येतात तसेच खाजगी रिक्षाचालकांनी ही भाविका साठी व्यवस्था केली आहे यात्रेच्या यशस्वीतेसाठी भैरवनाथ संस्थाचे अध्यक्ष व संचालक स्वंयसेवक ग्रामस्थ व पाचोरा डीवाय एसपी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरे चे साह्यक पोलीस निरीक्षक व कर्मचारी परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.