“मला न बोलण्याचे आदेश”; कोश्यारींचे मोघम वाक्य चर्चेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी मुंबई बाबत त्यांनी केलेलं वक्तव्य हे चांगलंच वादात सापडलं होतं. यासंदर्भात त्यांनी माफीदेखील मागितली.

महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) त्यांच्या हस्ते ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी बोलण टाळलं. प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच पाठ करुन त्यांनी काढता पाय घेतला. मात्र, यावेळी त्यांनी मोघम वक्तव्य केले जे सध्या चर्चेत आलं आहे.

माध्यमांचा आग्रहा पाहता मी बोलणार नाही. इथे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी बोला. मला बोलायचेच नाही. राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, अशी दोनचार मोघम वाक्य त्यांनी बोलली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यपाल हे घटनात्मक पद असल्याने त्यांना अशाप्रकारे बोलण्यास कोणी मनाई करू शकते का? अशी नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.