भडगाव शहर व ग्रामीण मतदार यादीत १२८९ डुप्लिकेट नावे

तहसिलदार व मुख्याधिकारी यांना तालुका काँग्रेस कमेटीतर्फे निवेदन

0

भडगाव शहर व ग्रामीण मतदार यादीत १२८९ डुप्लिकेट नावे

तहसिलदार व मुख्याधिकारी यांना तालुका काँग्रेस कमेटीतर्फे निवेदन

भडगाव प्रतिनिधी

भडगाव नगरपरिषद यादी व ग्रामीण भागातील याद्यांमध्ये 1289 डुबलीकेट मतदार असून त्यांची नावे तात्काळ कमी करण्यात यावी असे आशयाचे निवेदन व हरकती आज भडगाव काँग्रेस कमिटी तर्फ तहसीलदार शितल सोलाट व मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांना देण्यात आले.

भडगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी मतदार यादी मध्ये 1289 डुप्लीकेट नावे आढळून आले. सदर डुप्लिकेट नावे वगळण्यात यावे त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात यावी. या संदर्भात काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन व हरकती घेण्यात आल्या. यावेळी युवक काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव आशुतोष प्रदीपराव पवार, जळगाव जिल्हा सेवा दल अध्यक्ष संजय पाटील, तालुकाअध्यक्ष रतिलाल माळी, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मनोहर शिवाजी महाले, युवक विधानसभा उपाध्यक्ष धनंजय शिंदे, युवक शहराध्यक्ष गोविंद देशमुख, अल्पसंख्याक शहरअध्यक्ष कमर अली पटवे, तालुका युवक सरचिटणीस विशाल सोनवणे, शहर सचिव संजीव कोतकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.