भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारे डंपर पकडले !
जेसीबी घेऊन चालक फरार ; मालक व चालकावर गुन्हा दाखल
भडगाव गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन करणारे डंपर पकडले !
जेसीबी घेऊन चालक फरार ; मालक व चालकावर गुन्हा दाखल
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव शहरातील व तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक बेसुमार आहे याबाबत आज महसूल विभागाने भडगाव शहरातील पेठ भागातील स्मशानभूमी जवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या जेसीबीने वाळू उत्खनन करून डंपर मध्ये भरताना महसूल पथकाने कारवाई केली याबाबत जीसीबी घटनास्थळावरून फरार झाले तर डंपर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला जेसीबी व डंपर मालक व चालकांविरुद्ध विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,विजय भानुदास येवले (वय ५८) वर्ष, व्यवसाय नोकरी, मंडळ अधिकारी नगरदेवळा ता. पाचोरा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,भडगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातुन बाजुचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे.आज दि.०६/४/२०२५ रोजी सकाळी ३ वाजता चे सुमारास मी तसेच मेहमुद जब्बार खाटीक, ग्राम महसूल अधिकारी प्रमोदसिंग देवसिंग पाटील, ग्राम महसुल अधिकारी, दोघे नेमणुक तहसिल कार्यालय भडगाव असे तहसील कार्यालय भडगाव येथुन अवैध वाळु वाहतुक कारवाईसाठी आमच्या मोटार सायकल ने रवाना झालो. व स्मशानभूमी, भडगाव पेठ जवळ थांबलो. १ पिवळ्या रंगाचे जे. सी. बी. मशिनच्या सहाय्याने गिरणा नदीपात्रातून बाळु उत्खनन करून १ पांढरे व निळ्या रंगाचे डंपर मध्ये भरताना दिसले. म्हणून लागलीच आम्ही त्याठिकाणी जात असतांना सदर दोन्ही वाहनांवरिल चालक यांनी आम्हाला ओळखले व आम्ही जवळ येत असल्याचे पाहून त्यांच्यातील त्यांने त्यांचे जेसीबी चालकाने घेवून स्मशानभुमी रोड ने पळाले तेव्हा आमच्या सोबत असलेले प्रमोदसिंग देवसिंग पाटील, ग्राम महसुल अधिकारी यांनी जेसीबीचा फोटो काढला व जेसीबीचा चेसीस नंबर चा फोटो काढला असून सदर जे सी बी मशीनचा चेसीस क्रमांक HAR3DXXAL01494624 असा असलेले जेसीबी मालकाचे नाव रविद्र भगवान पवार रा. भडगाव पेठ, भडगाव असे आम्हाला नंतर कळाले व जेसीबी वरील चालक हा जेसीबी घेउन भडगाव शहराकडे पळून गेले व डंपर क MH३७ AA ८७८७ वरील ड्रायव्हर (चालक), यत्स आम्ही त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नामदेव रावन पाटील रा. भडगाव पेठ, भडगाव ता. भडगाव असे सांगितले व मीच इंपरचा मालक आहे असे सांगितले. ड्रायव्हर ग्रास आम्ही सदरचे रेतीचे डंपर सह तहसिल कार्यालय येथे जाणले ठिकाणावरून बंपर चालक (मालक) हा पंचनामा झाल्यावर निधुन गेला,
मुद्देमालाचे वर्णन खालीलप्रमाणे १)१०,००,००,०/- रूपये कि चे एक पिवळ्या रंगाचे जे.सी.बी. मशिन त्याचा चेसीस क्रमांक HAR3DXXAL01494624 असलेला जु.वा.कि.अ. २)५,००,००० रूपये कि, चे एक पांढरे व निल्या रंगाचे बंपर त्याचा क MH३७ AA ८७८७ असा असलेले जु. बा.कि.अ.३)६०००/- रूपये कि.चे १ ते सव्वा ब्रास बाळू कि.अ. असा एकूण १५०६०००/- चा मुद्देमाल येणेप्रमाणे वरिल वर्णनाचे व किंमतीचे १ जेसीबी च्या सहाय्याने १ डंपर मध्ये सदर वाहनांवरिल नामदेव रावन पाटील रा. भडगाव पेठ, भडगाव ता. भडगाव याने व जे सी बी मालक रविद्र भगवान पवार रा. भडगाव पेठ, भडगाव याचे मालकीचे जेसीबी वरील ड्रायव्हर यांचे नाव गाव माहित नाही अशांविरुध्द अवैध गौणखनिज १५०६००० /-रूपये कि.चे १ ते सव्वा ब्रास वाळू कि. अ गिरणा नदी पात्रातुन उत्खनन करुन चोरुन नेले आहे, सदर चोरी करते वेळी आम्ही छापा टाकण्यास गेलो असता त्याची चाहुल लागल्याने त्यांचे ताब्यातील वरिल वर्णनाचे जे सी बी हे त्यावरील चालक हा घेवून तेथून पळुन गेला आहे. व बंपर चालक याने अवैध वाळुची चोरी केली म्हणून त्यांचेविरुद्ध १२१/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०२(२) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(७),४८ (८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुढील तपास पो. हे कॉ.विजय जाधव हे करीत आहे