भडगाव तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीची लागली उत्सुकता
भडगाव – सागर महाजन
तालुक्यात एकुण ४९ ग्रामपंचायती आहेत. या एकुण ४९ ग्रामपंचायतींच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीसाठी महाराष्टृ शासनाने ५ मार्च रोजी राजपञ प्रसिद्ध केलेले आहे. या राजपञात जिल्हानिहाय लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण निच्चीत करुन दिलेले आहे. त्यानुसार लवकरच तालुका निहाय लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण निच्चीत करुन गावनिहाय आरक्षण भडगाव तहसिल कार्यालय ग्रामपंचायत निवडणुक विभागामार्फत लवकरच निच्चीत करण्यासाठी यंञणा सुरु आहे.
याबाबत जिल्हा प्रशासनानेही लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीसाठी आरक्षण काढलेले आहे. आता जिल्हा प्रशासनाकडुन लोकनियुक्त सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीची तारीख निच्चीत झाल्यावर भडगाव तहसिल कार्यालय ग्रामपंचायत निवडणुक विभागामार्फत लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लागणार आहे. तसेच अनुसुचीत जातीसाठी आरक्षित सरपंच पदे, अनुसुचीत जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे, नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंच पदे, खुला प्रवर्गासाठी सरपंच पदे असे आरक्षण लोकनियुक्त सरपंच पदासाठी निच्चीत करुन काढण्यात येणार आहेत. अशी माहिती भडगाव तहसिल कार्यालय निवडणुक विभागाचे लिपीक चेतन राजपुत यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली.
आपल्या गावाला आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण काय निघते? याकडे भडगाव तालुक्यातील सर्वपक्षिय मंडळी, पॅनल प्रमुख, ग्रामपंचायत निवडणुक लढविणारे इच्छुक मंडळींचे आतापासुनच लक्ष लागुन आहे. लोकनियुक्त सरपंच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाची तारीख जिल्हा प्रशासन केव्हा जाहीर करणार याची उत्सुकता नागरीकांना लागुन आहे.
भडगाव तालुक्यातील या ४९ ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच पदाचे आरक्षण आरक्षण सोडत काढण्यात येणार आहेत. यात पथराड, पासर्डी, पांढरद, पळासखेडे, महिंदळे, मळगाव, मांडकी, घुसर्डी खुर्द, लोण प्र. ऊ, लोण प्र. भ, पिचर्डे, शिवणी, गिरड, आमडदे, आडळसे, अंजनविहीरे, आंचळगाव, अंतुर्ली बुद्रुक, जुवार्डी, वरखेड, वडजी, वडगाव बुद्रुक, वडगाव नालबंदी, वलवाडी बुद्रुक, वाडे, वाक, बोरनार, बोदर्डे, बांबरुड प्र. ऊ, बांबरुड प्र. ब, बाळद खुर्द, बात्सर, भोरटेक बुद्रुक, भातखंडे बुद्रुक, भट्टगाव, सावदे, पिंपरखेड, पिंप्रीहाट, पिंपळगाव बुद्रुक, शिंदी, गुढे, खेडगाव खुर्द, निंभोरा, गोंडगाव, कजगाव, कोळगाव, कोठली, कनाशी, तांदुळवाडी या गावांचा समावेश आहे. अशी माहिती भडगाव तहसिल कार्यालय निवडणुक विभाग लिपीक चेतन राजपुत यांनी दै. लोकशाहीशी बोलतांना दिली.