भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा तिसऱ्यांदा आमदार पदि निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ सन्मान भेट वस्तू देत सत्कार करण्यात आले. सत्काराचा कार्यक्रम यशराज हॉल येथे पार पडला.
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून व्यापारी संघ ज्येष्ठ मार्गदर्शक काँग्रस जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, तालुका समन्वय अध्यक्ष युवराज पाटील, युवराज तहसीलदार, काँग्रेस प्रदेश सचिव आशुतोष पवार, जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघाचे अध्यक्ष नितीन महाजन, किराणा संघाचे राजेंद्र शिनकर, शिवसेना शहर प्रमुख अजय चौधरी, नंदू देवरे, योगेश गंजे, महेंद्र ततार, रावसाहेब पाटील सह आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी व्यापारी बांधवांचे आभार मानत भडगाव तालुक्याचा व्यापार जास्तीत जास्त वाढला पाहिजे छोट्या व्यापारीने मोठ्या व्यापराकडे मार्गक्रमण करावे असे सांगत स्वतः चे काही अनुभव ही कथन केले.
यावेळी जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघ अध्यक्ष नितीन महाजन, निलेश महाले, विकास तोतला, सुरेश भंडारी, सहकारी तसेच जिल्हा परिषद व्यापारी संकुल संघाचे उदय देशमुख, मिलिंद मोरे, शिवजी शिरसाठ, आण्णा कोळी, विकास महाजन, सूर्यभान वाघ, भाऊसाहेब पाटील, कुद्दुस मणियार, गफ्फार मणियार, महेद्र पाटील, भारत धोबी, संजय वाणी, राजेंद्र शिंपी, जिभू महाजन, योगेश वाणी, शांताराम पाटील, अर्जुन कोळी, अजित मोलाना, गोकुळ चव्हाण, केशव चव्हाण, संतोष चव्हान, आबा शिरसाठ, बापू पाटील आदी उपस्थित होते.