इथून पुढे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षच जिंकेल – राहुल गांधी

0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने देशात फक्त द्वेष पसरविला ; जनआक्रोश रॅलीत आरोप
नवी दिल्ली ;- आता काँग्रेस पक्ष इथून पुढील सर्व निवडणुका जिंकणार असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा छावा असून पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला आदर दिला जातो . मात्र भाजपमध्ये फक्त पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनाच दिला जातो . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाने देशात फक्त द्वेष पसरवल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. ते जनआक्रोश रॅलीत बोलत होते.

अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांवर टीका केली. लाखो लोकांच्या उपस्थितीत रामलीला मैदान दिल्ली येथे, सरकार विरुद्ध कॉंग्रेसचे विराट जन आक्रोश आंदोलन आज येथे झाले .


भाजपाच्या धोरणांमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. मोदींच्या ना शब्दांत वजन आहे ना त्यांच्या भाषणात पारदर्शकता असते. ते जिथेही जातात तिथे फक्त भाषणे करतात. समाजातील प्रत्येक घटकांची त्यांच्यावर नजर आहे. त्यांनी देशातील कोट्यवधी लोकांची निराशा केली आहे. जिथे संधी मिळेल तिथे भाषण करणारे आमचे पंतप्रधान भ्रष्टाचार, महिला, दलितांवरील अत्याचार, बेरोजगारी यावर काहीच बोलत नाहीत. काँग्रेस देशातील शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला नसता तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या जमिनी लाटल्या असत्या, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच शेतकऱ्यांचे हित साधू शकते. काँग्रेसने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतल्याचे ते म्हणाले.

काँग्रेसचा कार्यकर्ता ‘शेर का बच्चा’ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आपला जीव दिला आहे. काँग्रेस पक्षात सर्वांचा आदर केला जातो आणि केली जाईल. जे कार्यकर्त्यांचा आदर करणार नाहीत त्यांच्यावर मी कारवाई करेन. हा पक्ष संपूर्ण देशाचा आहे. भाजपामध्ये फक्त मोदी आणि अमित शाह यांनाच आदर दिला जातो. तिथे कार्यकर्त्यांची कदर केली जात नसल्याचा टोला राहुल गांधी यांनी आज जनक्रोष रॅलीत लगावला. तसेच यावर्षी जिथे जिथे निवडणुका होतील तिथे काँग्रेस सत्तेवर येईल असा विश्वासही व्यक्त केला. मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगडमध्ये आणि २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचा विजय होईल, असे कार्यकर्त्यांना त्यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.