divigel free coupon tribeca med spa coupon ponilox coupons knaldeals coupon macy's online printable coupons 2013 bioshock fort frolic gift
Thursday, December 1, 2022

भडगावमधील 38 वर्षीय तरुण बेपत्ता

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शहरातील वाचनालय गल्लीतील 38 वर्षीय तरुण हा मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून निघून गेला त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही म्हणून भडगाव पोलिस स्टेशनला रजिस्टर नंबर 50/2022 प्रमाणे हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

शहरातील वाचनालय गल्लीतील निरंजन प्रकाश पाटील (वय 38) हा दि. 27 रोजी सायंकाळी पाच वाजता मी बाहेर जाऊन येतो असे घरी सांगून निघून गेला असून याचा भडगाव शहरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला, परंतु मिळून न आल्याने मानसी निरंजन पाटील यांच्या खबरिवरून भडगाव पोलिस स्टेशनला हरवल्याची नोंद दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

निरंजन प्रकाश पाटील यांचे वर्णन पुढील प्रमाणे 5 फूट, 5 इंच, शरीराने मध्यम, रंग- सावळा, चेहरा-गोल, दाढी व मिशी वाढलेली, डोळ्यांवर नजरेचा  चष्मा, अंगात पांढऱ्या रंगाचा कॉलरचा टी शर्ट, निळया रंगाची जीन्स पँट, काळसर रंगाची चप्पल, असलेला तरुण कुठेही आढळून आला तर भडगाव पोलिस स्टेशनला संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पो. हे. काँ. विलास पाटील करत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या