भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरातील पांडव बियरबारमध्ये बिल देण्याच्या करणावरून झालेल्या वादात तीन जणांविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बढे कॉम्प्लेक्स मधील पांडव बियर बार या ठिकाणी साजिद अली शेख, मुन्ना शेख (दोघांची पूर्ण नाव माहित नाही) रा. सय्यद वाडा भडगाव व मुन्ना शेख याचा पाहुणा (पूर्ण नाव माहित नाही) रा. वरणगाव ता. भुसावळ या तिघांनी दि 3 जून रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास बढे कॉम्प्लेक्स मधील पांडव बियर बारमध्ये दारूच्या बिलावरून वाद करत बियरच्या बाटल्यांनी मारहाण केली.
तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. व हॉटेलच्या क्वान्टरमधील सुमारे 12500 रुपये रोख जबरदस्तीने काढून घेतले. फ्रिज तोडून बियर बाटल्या फोडुन नुकसान केले. भांडण सोडविण्यास गेलेले संजय पाटील, नंदकिशोर मराठे, ईश्वर महाजन यांना चापटा बुक्क्यांनी व बियरच्या बाटल्यांनी मारहाण केली म्हणून तिघा आरोपींविरुद्ध हॉटेल मॅनेजर विजय अहिरे रा. यशवंत नगर यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात गु.र.न 130/ 2022 भा. द.वी कलम 227, 324, 323, 504, 506 , 427, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.