राज्यपालांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी “हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज” (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या संदर्भात अपमानजनक बेताल वक्तव्य करून मराठी माणसांच्या भावना दुखावल्या. महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीने हे महाशय वारंवार महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करत आहेत. यांची पदावरून लवकर हकालपट्टी करावी असे लेखी निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) भडगाव तालुकातर्फे तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष राहुल पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष योजना पाटील, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष निमन शेख, असंघटित कामगार महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेंद्र मोरे, माजी शहराध्यक्ष रवींद्र महाजन, जिल्हा प्रवक्ते भूषण पाटील, कुणाल पाटील, विकी पाटील, विवेक पवार, दादाभाऊ बनकर, रोहन परदेशी, परमेश्वर मोरे, योगेश महाजन, सागर गढरी, सुनील सोनवणे, शुभम पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.