रस्सीखेच व समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषद अव्वल

गोळा फेकमध्ये द्वितीय

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग क्रीडा धोरण अंतर्गत नाशिक विभाग स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील क्रीडा भवन व सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. जळगाव जिल्ह्याच्या वतीने भडगाव नगरपरिषद महिला रस्सीखेच संघाने नाशिक जिल्हा संघाला पराभूत करून प्रथम क्रमांक मिळवला.

गोळा फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक  तर समूह गायन स्पर्धेत भडगाव नगर परिषदेने प्रथम क्रमांक पटकावून राज्य स्तरावर आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये आपला सहभाग निश्चित केला आहे. तरी सदर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांचे मार्गदर्शन तसेच नगरपरिषदेमधील कर निरीक्षक भारती निकुंभ, शहर अभियंता अपूर्वा आगळे,स्वच्छता निरीक्षक निशा लोट कार्यालय अधीक्षक पंकज सूर्यवंशी, पाणी पुरवठा अभियंता गणेश लाड, राहुल साळुंके, छोटू वैद्य, स्वप्नील सोळंके, आशुतोष राजपूत यांचा सहभाग दिसून आला.

 

महिला रस्सीखेच विजयी संघ 

1, भारती राजेश रील 2 अलका राजू गोयर 3 लक्ष्मी सोमनाथ कंडारे 4, शालू सुरज सिरसे, 5, पूजा सुनील कंडारे, 6, वंदना नरेश टाक, 7, लक्ष्मी भगवान कंडारे,8, भारती नितीन  सिरसे.

 

गोळाफेक विजेता 

आकाश गुजराथी

 

समूह गायन विजेता संघ नितीन पवार, किशोर पाटील, सुरेश पाटील, श्रीराम वाघ , अविनाश पवार, श्रावण पवार, संदीप पवार, दिलीप कोळी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.