भडगाव ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव; तरुणांचे आंदोलन

0

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव ग्रामीण रुग्णालयात (Bhadgaon Gramin Rugnalaya) पुर्णवेळ डॉक्टर नाहीत तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नाही. सदर दवाखान्यात प्रसूतीसाठी तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने पेशंटला जळगाव घेऊन जा असे सांगितले जाते. मात्र रुग्णाची अनेकदा काही कारणास्तव रुग्णाला जळगावला (Jalgaon) नेणे शक्य नसते. त्यामुळे नाईलाजास्तव रुग्णाला खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले.

वास्तविक सदर पेशंटला दवाखान्यात नेण्याच्या तीन दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी पेशंटला दवाखान्यात आणा आम्ही सिजर करून देऊ असे सांगितले होते. परंतु सदर पेशंटला दवाखान्यात नेले असता सिजर डिलिव्हरी करणारे डॉक्टर त्यांच्या वैद्यकीय कामासाठी बाहेरगावी गेले आहेत असे सांगण्यात आले. अशा प्रकारे भडगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध राहत नसल्याने गोरगरिबांची अतोनात हाल होत असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. वेळप्रसंगी नागरिकांचे जीव जातात असा प्रकार सतत भडगाव ग्रामीण रुग्णालयात चालू आहे. तरी आपण योग्य ती कारवी लवकरात लवकर करावी व निस्वार्थ डॉक्टरांची नियुक्ती करावी. अन्यथा भडगाव तालुक्यातील नागरिकांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याचे होणारे परिणाम आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी, असे निवेदन देण्यात आले.

यावेळी मुन्ना परदेशी, मनोहर चौधरी, माधव राजपुत, सागर महाजन, राहुल देशमुख, सचिन पवार, किरण शिंपी, विश्वनाथ भोई, सुनील भोई, विशाल चौधरी, सौरभ देशमुख, राहूल महाजन, कुणाल पाटील, निखिल कासार, नितेश पाटील, सुमित जाधव, खुशाल पाटील, लाला परदेशी, राहूल सोनार, प्रशांत महाजन, सागर पाटील, आकाश महाले, किरण देसले, दादु पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.