Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»गिरणामाईच्या वस्त्रहरणकर्त्यांना लगाम लागणार कधी ?
    जळगाव जिल्हा

    गिरणामाईच्या वस्त्रहरणकर्त्यांना लगाम लागणार कधी ?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 29, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क 

    गिरणा नदीच्या पात्रातून शेकडो वाहनांच्या साह्याने अवैधरित्या वाळूचा उपसा सुरुच आहे. महसूल विभागाकडून कारवार्इ होत असतानाही गिरणामार्इचे वस्त्रहरण मात्र थांबण्याचे नाव घेत नाही. दि. 1एप्रिल 2024 ते 1 एप्रिल 2025 पर्यंत महसुल प्रशासनाने 102 वाहनांवर दंडात्मक  कारवार्इ केली असून त्या माध्यमातून 1 कोटी 16 लाख 45 हजार रुपयांचा दंड वसुल देखील केला आहे. यातील 7 वाहनांवर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागामार्फत वाहने वर्ग केल्यानंतर एकूण 23 लाख 612 रुपयांचा दंड वसुल करण्यात येणार आहे.

    महसुल विभागाचे वाळू चोरट्यांविरुद्ध धाडसत्र सुरु आहे मात्र दुसरीकडे अवैध वाळूचा उपसा थांबायला तयार नाही. राजकीय पाणी मुरायला लागल्याने वाळू माफीयांची मुजोरी वाढल्याचे दिसत आहे. अवैध गौण खनिज चोरी रोखण्याचे प्रशासनाला आव्हान ठरतांना दिसत आहे. गिरणामाईचे वस्त्रहरण सुरुच असून महसुल प्रशासनासोबतच पोलीस प्रशासनानेही वाळू चोरट्यांविरुद्ध कठोर पाऊले उचलावित अशी अपेक्षा सुज्ञ नागरीक व निसर्ग प्रेमी मंडळीमधून व्यक्त होतांना दिसत आहे.

    भडगाव शहर परिसरात गिरणा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा बिनधास्तपणे सुरुच आहे. यात गिरणा कॉलनीच्या बाजुला पाणी पुरवठा विहीर परिसर, पेठ, घोडदे, वाक, पिंपळगाव बुद्रुक, कोठली या परिसरात अवैध वाळू चोरट्यांचा जणू अड्डाच बनल्याचे चित्र आहे. शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची रात्रंदिवस निगराणी असूनही अवैध वाळूचा उपसा सुरु आहे. तिसऱ्या डोळ्यातून हे विदारक चित्र कैद होत असले तरी प्रशासनाच्या उघड्या डोळ्यांना मात्र दिसत नाही ही शोकांतिका आहे. अवैधरित्या वाळू उपसा, विना परवाना मुरुम उत्खनन असे अवैध गौण खनिजची दररोज मोठ्या प्रमाणात चोरी होतांना दिसत आहे. घोडदे देवस्थानासमोर अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने व शेतकऱ्यांनी लोकसहभागातून सिमेंटचे पिलर उभारुन वाहनांसाठी रस्ता रोखण्यासाठी बांधकाम केले होते परंतु हे पिलरही चोरट्यांनी तोडून वाळू उपसा करणारे 50 ते 60 ट्रॅक्टर बिनधास्तपणे वाहतुक करतांना दिसतात. वाळुचे वाहनांद्धारा वाहतुक करुन तितुर नदीच्या पात्रात वाळूचे अवैध थप्पे मारले जात आहे. बांबरुड प्र. ब, लोहटार मार्गाने रात्रभर अवैधरित्या ट्रॅक्टरने वाळू वाहतूक केली जात आहे. यामुळे घोडदे देवस्थान व जुना पिंपळगाव रस्त्याची वाहनांमुळे अतिशय दुर्दशा झालेली आहे.

    निंभोरा, सावदे, गुढे, नावरे, वाडे, बांबरुड महादेवाचे, भट्टगाव आदी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळु उपसा सर्रास सुरु असल्याची नागरिकात चर्चा आहे. विना परवाना मुरुम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मुरुम चोरट्यांवर प्रशासन कुठेच कारवार्इ करतांना दिसत नाही. त्यामुळे मुरुम चोरट्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.

    गिरणा नदीकाठावरील शेतांमध्ये अवैधरित्या वाळूचे थप्पे मारले जात आहेत. त्याठिकाणाहुन जेसीपी मशीनने वाळू ढंपर भरुन त्याची विल्हेवाट लावली जात आहे. भविष्यात गिरणा काठावरील सिंचन विहीरींची पाण्याची कमतरता होऊन तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार अशी स्थिती आहे.

     

    सात पथकांची नेमणूक

    अवैधरित्या वाळू उपसा व चोरी रोखण्यासाठी महसूल विभागाने सात पथकांची नेमणूक केलेली आहे. या पथकात नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह कर्मचाऱ्यांची नेमणुक केलेली आहे. महसूल पथकांची वाळू चोरट्यांवर नजर असून कारवार्इचे धाडसत्र सुरुच आहे. तहसीलदार शितल सोलाट यांनी मोठ्या प्रमाणावर कारवार्इचा बडगा उगारला आहे. महसूल प्रशासनाच्या एवढ्या कारवार्इ केल्यानंतरही उपसा मात्र सुरुच आहे.

     

    कुठेतरी मुरतेय्‌ पाणी

    महहसूल विभागाकडून अवैध वाळूचा उपसा रोखण्यासाठी कारवार्इचे सत्र सुरु असतांनाही मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरु असल्याने या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याची चर्चा आहे. काही राजकीय पुढारी या प्रकरणात हात ‘पिवळे’ करुन घेत असल्याने हे प्रकार वाढल्याची शंका आहे.

    #bhadgaon Girana River
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026

    उशिराने लग्न लागल्यामुळे वधू वर पक्षाला 2 हजारांचा दंड

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif