भडगावात पत्यांच्या क्लबवर धाड, 12 जुगारींवर गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव शहरात पारोळा चौफुलीजवळ विश्रामगृहाच्या बाजूला एका पत्रीच्या आडोशाला चालू असलेल्या पत्ता जुगारावर सहाय्यक पोलीस अधीक्षक सो चाळीसगाव यांच्या पथकाने छापा टाकला.

या छाप्यात 46670 रुपये रोख रक्कम आरोपींकडे मिळून आली. 12 आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा छापा स्वतः सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, उपविभागीय कार्यालयातील अमोल पाटील, महेश बागुल, गणेश नेटके, उज्ज्वल म्हस्के, विकास पाटील यांच्या पथकाने कामगिरी केली. याप्रकरणी भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.