महिलेला विष पाजून पतीला मारहाण; गुन्हा दाखल

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. घर खाली करण्याच्या कारणावरून महिलेला विषारी औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन जणांवर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की,निला अरूण देवरे (वय ५३, रा.श्रमीक नगर नाशिक, ह.मु. देव्हारी कनाशी ता. भडगाव) या आपल्या पती व कुटुंबियांसह राहतात. त्यांनी त्यांचे घर अजबराव हिलाल पाटील यांना भाड्याने दिले आहे. २९ एप्रिल रोजी निला देवरे यांनी अजबराव पाटील यांना घर खाली करून द्या असे सांगितले. याचा राग आल्याने अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील तीन्ही रा. देव्हारी कनाशी ता भडगाव यांनी विवाहितेला विषारी औषध पाजून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच तिचा पती अरूण देवरे याला देखील बांबूने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. दरम्यान विवाहितेला अत्यवस्थ वाटत असल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अजबराव हिलाल पाटील, रोहिदास अजबराव पाटील आणि विकास बाबुराव पाटील तीन्ही रा. देव्हारी कनाशी ता भडगाव या तिघांवर गु. र. न.८५/२०२२ भा. द. वी. कलम ३०७,३२४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.