भल्या पहाटे अवैध वाळूचे ३ डंपर जप्त

चाळीसगाव DYSP पथकाची मोठी कारवाई

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यात व शहरात सध्या गिरणा नदी पात्रातील अवैध वाळू वाहतूक हा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.  याबाबत सतत कारवाई करून सुद्धा वाळूमाफिया हे गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच ठेवत आहेत. याप्रकरणी आज चाळीसगाव DYSP पथकाने मोठी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकातील पो.हे.कॉ.संभाजी पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र पाटील, पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर बडगुजर, पो.हे.कॉ. प्रकाश महाजन यांनी आज सकाळी सहा वाजता नालबंदी ते पळासखेडा गावादरम्यान तीन दहा टायरी वाळू भरलेले डंपर पकडले.   ते डंपर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे. या अवैध वाळूचे तीनही डंपर पोलिसांनी महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.

भडगाव तालुक्यात व भडगाव शहरात गिरणा नदी पात्रातून दररोज 50 ते 60 डंपर व शेकडो ट्रॅक्टर हे अवैध वाळू वाहतूक करतात. यावर गेल्या दोन महिन्यांपासून भडगाव महसूल विभागाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचललेला आहे व तो बडगा कायम सुरू राहणार आहे. यातच आज सकाळी चाळीसगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश चंदेल यांच्या पथकाने नालबंदी ते पळासखेडा गावाच्या दरम्यान या तीनही डंपरवर कारवाई केली.

अवैध वाळू वाहतुकीचे येथीलही डंपर पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आले असून ते पुढील कारवाईसाठी भडगाव महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.