भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.उ.येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर आज दुपारी भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत स्वराज कंपनीचे निळे ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी योगेश पाटील, समाधान हुल्लुळे, अभिमन्यू वारे यांनी केली आहे. याबाबत बांबरुड येथील नदी पात्रात चालणारे जेसीबी व डंपर यांच्यावर सुध्दा अशाच प्रकारे कारवाई करावी अशी मागणी होत आहे