नागरिकांच्या सतर्कतेने अट्टल चोर जेरबंद

भडगाव पोलिसांना मोठे यश

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्याने भडगाव पोलिसांना यश आले असून  आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

शहरातील भवानी बाग परीसरातील रामकृष्ण नगर रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नीसह मुलीकडे बाहेर गावी गेले होते. आत्माराम पाटील यांचे घर बंद असल्याने प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल), विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) या दोघे चोरट्यांनी दि.  १७ जानेवारी रोजी ३ वाजेच्या सुमारास  बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या घरासमोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे (मुगटीकर), यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी काॅलनीतील इतर रहिवाशी जागृत करून हा प्रकार सांगितला.

यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होन्डा शाहीन मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९- डी.ए. ८३८६ घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप भास्कर मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला. यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पीएसआय किशोर पाटील, एएसआय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन पेठ चौफुलीवर दोन चोरट्यांपैकी प्रविण संभाजी पाटील (वय ३५, रा. बाम्हणे ता. एरंडोल) यास पकडण्यात यश आले.

तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव (रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल) हा पळवुन जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. प्रविण संभाजी पाटील आणि  विभोर जुलाल जाधव  या दोघे चोरट्याविरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता नुसार ३३१ (४), ३०५(अ), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण संभाजी पाटील यास पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली  असून पुढील तपास पो. हे काँ. विजय जाधव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.