6 वर्षीय बालिकेवर अत्याचार; संशयित अटकेत

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच आहे. तसेच अल्पवयीन मुली देखील सुरक्षित नसल्याने पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारी 6 वर्षीय बालिका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील संशयित आरोपी विकास सिताराम पाटील याने गोड बोलून मुलगी खेळत असताना घरात बोलून, ‘मी पैसे देतो कुणाला काहीही सांगू नको’, असे म्हणून दरवाजा बंद करून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला.

यासंदर्भात पिडीत मुलीने नातेवाईकांना सांगितले. नातेवाइकांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन पीडित मुलीचे आजोबा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विकास सिताराम पाटील यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.