विवाहितेवर अतिप्रसंग करणाऱ्या संशयिताचे रेखाचित्र जारी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव शहरात अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत भडगाव पोलीस स्टेशन गु.र. न.३३१/२०२२ भा.द.वी कलम ३०७, ३५४, ३५४ (अ), ३२३, ५१० मधील संशयित आरोपीताचे रेखाचित्र जारी केले असून संशयित आरोपी मिळून आल्यास किंवा कोणास आढळल्यास भडगाव पोलीस स्टेशन जि. जळगाव येथे संपर्क करण्यात यावा.

या संशयित इसमाचे वर्णन खालील प्रमाणे वय अंदाजे ५० वर्षे, चॉकलेटी रंगाचा शर्ट, हिरव्या रंगाची पॅन्ट, पायात बूट, दाढी बारीक तपासी अधिकारी स.पो. निरीक्षक चंद्रसेन पालकर मोबाईल क्रमांक ९९६७९१४६४१ तसेच पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर मोबाईल क्रमांक ८६९१८६९९९३ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.