अतिप्रसंगाला विरोध करताच विवाहितेला पेटवले

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून अज्ञात व्यक्तीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना दि. २३ रोजी घडली. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरातील ओम शांती केंद्राच्या मागे एक ५० वर्षीय अनोळखी पुरुषाने ४७ वर्षीय पिडीत विवाहितेचा हात पकडून अश्लिल संवाद करत पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच यानंतर त्याने पिडीतेवर अतिप्रसंग केला. पिडीत महिलेने विरोध करताच आग पेटीने पेटवून देत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी अंगात चॉकलेटी तपकिरी रंगाचा शर्ट, हिरवट पॅट, पायात बूट, बारीक दाढी अशा वर्णनाच्या ५० वर्षीय अज्ञात व्यक्ती विरुद्ध भडगांव पोलीस स्टेशनला भादवी. कलम ३०७, ३५४, ३५४ (अ) ३२३, ५१० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

दरम्यान पिडीत महिलेवर जळगाव येथे उपचार सुरु होते. सध्या औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात या पिडीत महिलेवर औषधोपचार सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली. आज घटनास्थळी जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक चाळीसगाव भाग रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक चाळीसगाव विभाग अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलीस उप निरीक्षक गणेश वाघमारे, जळगाव फाॅरेन्सीक टिम आदिंनी भेट देउन पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.