corporate diwali gifts india pharmaceutical coupon programs my makeup brush set coupons yeti gift set amazon
Friday, December 2, 2022

गणेशोत्सवात अहिराणी गितांच्या तालावर थिरकले प्रेक्षक

- Advertisement -

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गणेशोत्सवानिमित्त जय बजरंग मित्र मंडळ भोईवाड्याचा राजा, रूपाली नरेंद्र पाटील व नरेंद्र पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत नगर भोईवाडा येथे मराठी, अहिराणी भाषेतील गीतांचा धम्माल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रसिध्द सिंगर भैय्यासाहेब मोरे, रवी खरे, संगीतकार समीर के. एस, अभिनेता विनोद कुमावत, राणी कुमावत, रुपेश पाईकराव, लेखक सोपान महाजन आदि कलाकारांनी उपस्थिती देऊन गीते सादर केली. त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित प्रेक्षकांनी ठेका धरत जल्लोष केला.

- Advertisement -

या कार्यक्रमाचे उद्घाटन पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, विशाल पाटील, मंडळातील ज्येष्ठ नागरिक हुनाबाबा भोई, तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, समाधान कोळी, मंडळाचे सदस्य नरेंद्र पाटील, महेंद्र मोरे, रुपाली पाटील, संगितकार व गायक यांनी केले. त्यांचा सत्कार मंडळाकडून झाला.

- Advertisement -

यावेळी माडी वहू तुले हुई जाई, कर मन्ह लगीन, आम्हू आदिवासी, तून्हा यार स आदिवासी, मेहंदी ना हाथ, बाबा ना अंगारा, महात्मा ज्योतिबा फुले, नजर लागणी कोणी मन्हा प्याराला, माय माझा भीमराव, मंन्ही नवरी राही खंदेशनी, पोरी तुम्ना पायल, आदी गीत सादर करून त्यावर नृत्याची धम्माल करण्यात आली.  प्रेक्षकांनी ही मोठा जल्लोष केला. कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

यशवंत नगर येथे गणेशोत्सवानिमित्त जय बजरंग मित्र मंडळ भोईवाड्याचा राजा, रूपाली नरेंद्र पाटील व नरेंद्र पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन होत असते. कोरोना दरम्यान येथील सांस्कृतिक कार्यक्रमात दोन वर्ष खंड होता. तीच कसर भरून काढत यंदा मोठ्यप्रमाणावर मंडळाने गणेशोत्सव साजरा केला. मंडळात बुऱ्हाणपूर हून आणलेली गणेशाची 18 फूट उंच भव्य मूर्ती मोठ्या जल्लोषात स्थापन करण्यात आली होती. येथे मंडळाच्या वतीने निवडणुक जनजागृती नाटिका, मतदान आधार नोंदणी जनजागृती, स्वच्छता मोहीम, लिंबू चमचा, संगीत खुर्ची आदी कर्मक्रम मोठ्या जल्लोषात पार पडले. यातील विजेत त्यांचा सत्कार भैय्या मोरे यांच्या सिंगींग शो मध्ये करण्यात आला.

यावेळी  योजनाताई पाटील, निलेश मालपुरे, माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले, बापू शार्दुल, जगन भोई, संतोष महाजन, राजु पाटील, डॉ. विलास पाटील, कॅमेरामन मयूर मोरे, मराठा प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलचे स्वरूप पाटील  यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रा. प्रविण महाजन, नरेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास भोईवाड्याचाराजा, जय बजरंग मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या