भडगाव लोकशाही न्यूज नेटवर्क
एकाबाजूला शासन झाडे लावा, झाडे जगवा अशी फलकबाजी करुन जाहिरातीवर लाखो रुपये खर्च करत असून दुसरीकडे भडगाव पाचोरा तालुक्यातील शेतशिवारात तसेच राखीव जंगलात विरप्पनच्या पिल्लावळीने धुमाकूळ घातला असून दररोज शेकडो नव्हे तर हजारो हिरव्यागार वृक्षांची कत्तल करत आहेत.
याबाबत तालुक्यातील निसर्गप्रेमी व वृक्ष प्रेमींनी वारंवार आवाज उठवला तसेच वनविभाग व महसूल विभागाकडे तोंडी व लेखी स्वरुपात तक्रारी देऊनही कारवाई होत नसून उलट दिवसेंदिवस हिरव्यागार वृक्षांची स्वयंचलित यंत्राच्या साह्याने दिवसाढवळ्या कत्तल सुरु असल्याने संबंधित विभाग डोळे असून आंधळ्याची (अर्थपूर्ण) भुमिका बजात असल्याचा आरोप निसर्गप्रेमी व सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
शहरातली लाकुड तस्कर परिसरात लाकडाचा सौदा करण्यासाठी एका ठिकाणी थांबला असता काही निसर्गप्रेमींनी त्याची भेट घेऊन तुम्ही आमच्या परिसरातील शेतशिवारात किंवा राखीव जंगलात वृक्षतोड करु नका अशी विनंती केली होती. मात्र संबंधित मुजोर लाकुड तस्कर याने संबधितांचे काहीएक ऐकून न घेता माझी वृक्षतोड सुरूच राहील तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगत मी पोलिस व वनविभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांना घाबरत नाही मी त्यांना हप्ते देतो व खिशात घेऊन फिरतो असे वादग्रस्त वक्तव्य करुन पोलिस विभाग व वनविभागाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे.
म्हणून आतातरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अश्या मुजोर लाकुड तस्कराच कायमस्वरूपी बंदोबस्त करुन दररोज कापले जाणारे शेकडो वृक्ष वाढवतील व आम्ही हप्ते देतो असे म्हणणाऱ्या लाकुड व्यापाऱ्याला त्याची दाखवतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त के आहे
म्हणून आतातरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अश्या मुजोर लाकुड व्यापाऱ्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करुन दररोज कापले जाणारे शेकडो वृक्ष वाढवतील व आम्ही हप्ते देतो असे म्हणणाऱ्या लाकुड व्यापाऱ्याला त्याची जागा दाखवतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.