महाएफपीसी अंतर्गत नाफेड चना (हरभरा) खरेदी केंद्र सुरू

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव येथे महाएफपीसी अंतर्गत रजनीताई देशमुख फार्मर्स प्रोड्युसर कंपनी येथे चना खरेदीचा शुभारंभ कंपनीच्या चेअरमन यांच्या हस्ते करण्यात आला. जयंतीलाल हिरालाल परदेशी या शेतकऱ्याचा प्रथम माल मोजून शुभारंभ करण्यात आला. यावेळी जेष्ठ संचालक नानासाहेब देशमुख, अनिल पाटील, कांतीलाल परदेशी व आदी शेतकरी उपस्थित होते. तसेच चना नोंदणी शेतकऱ्यांनी केलेली असून चण्यासाठी हमीभाव 5335/-रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. रजनीताई देशमुख फार्मर्स प्रोड्युसर कंपनी भडगाव चे चेअरमन सौरभ विजयकुमार देशमुख यांनी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here