सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक भावना दुखावल्याने डॉ. गणेश राठोड यांच्यावर कारवाई करावी

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तहसिलदार व पोलिस निरीक्षक यांना राजपूत समाजाचे निवेदन देण्यात आले. जातीवाचक बोलून भावना दुखावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी असे निवेदन भडगाव तालुका राजपूत समाज मंडळ यांनी भडगाव तहसिलदार मुकेश हिवाळे व पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांना दिले. गोद्री ता.जामनेर येथे राजपुत समाजा बद्दल अपशब्द वापरल्या कारणाणे समस्त भडगाव तालुक्यातील राजपुत समाज बांधवांनी भडगाव पोलीस स्टेशन व तहशिल कार्यालय येथे निवेदन दिले व समाजाची बदनामी केले प्रकरणी त्यांचावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदन केली आहे. या वेळी भडगाव तालुक्यातील समस्त राजपूत समाज निवेदन देताना उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.