Saturday, January 28, 2023

अशीही जिद्द ! शेतकऱ्याचा मुलगा झाला पी. एस. आय

- Advertisement -

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले व कजगाव बीट (पोलिस चौकी) येथे येथे सेवा बजावणारे पोलिस कॉन्स्टेबल गणेश विलास कुमावत मु.पो.बेलदारवाडी ता.चाळीसगाव जि जळगाव हे खात्याअंतर्गत परीक्षा देत पी. एस. आय. परीक्षेत पास झाले असून काही दिवसात ते ट्रेनिंगसाठी रवाना होणार आहेत.

गणेश कुमावत हे एका शेतकऱ्याचे पुत्र आहे. आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेऊन डी.एड केले. पोलिस कॉन्स्टेबल ते पी. एस. आय. असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आहे. गणेश कुमावत यांची पी. एस.आय पदी निवड झाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याबाबत भडगाव पोलिस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व सर्व पोलिस मित्रांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देत गणेश कुमावत यांचा सत्कार केला.

- Advertisement -

गणेश कुमावत यांनी इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंत शिक्षण आदिवासी आश्रमशाळा वलठाण ता. चाळीसगाव याठिकाणी घेतले. इयत्ता 11वी व 12 वीचे शिक्षण रा. वि. ज्यू. कॉलेज चाळीसगाव, त्यानंतर डी.एड 2012 मध्ये उत्तीर्ण झाले. त्यानंतर एम.पी.एस.सी चे क्लास जळगाव येथे करत त्याच दरम्यान 2013 साली पोलिस भरती निघाली. व पहिल्याच प्रयत्नात 2013 ला पोलिस भरती झाले. पण गणेश यांच्या मनात स्वप्न पी. एस. आय व्हायचं होत. जालना प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग करून 2014 मध्ये जळगाव परत आल्यावर दंगा नियंत्रण पथक (RCP) मध्ये 2017 पर्यंत नेमणुक करत त्यानंतर 2017 मध्ये 2 महिने पोलिस मुख्यालय येथे काढले.

जून 2017 मध्ये बदली झाली व भडगाव पोलिस स्टेशन मिळाले. सुरुवातीला 2 वर्ष पोलिस स्टेशनला ऑफिस काम केले. नंतर कजगाव बिटला नेमणूक झाली. ते आतापावेतो कजगाव बिटलाच आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये डिपार्टमेंटल पी. एस. आय. परीक्षेची 250 जागेसाठी जाहिरात निघाली तेव्हा अभ्यास चालू केला. दि. 16/04/2022 रोजी पूर्व परीक्षा झाली त्यामध्ये ते पास झाले. त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास करून दि. 30/07/2022 रोजी मुख्य परिक्ष देऊन ती देखील पास झाल्यानंतर फक्त ग्राउंड राहिले होते. त्यासाठी 4 महिने वेळ मिळाला. ग्राउंडचा सराव चाळीसगावलाच केला. कुठलीही अकॅडमी जॉईन न करता. फिजिकल टेस्टची तारीख दि. 30/11/2022 आली. त्यादिवशी फिजिकल टेस्ट झाली.

अशा प्रकारे मुख्य परीक्षेत 239.5 मार्क्स व फिजिकल मध्ये 94 मार्क्स असे एकूण 333.5 मार्क्स मिळवून 250 जागामध्ये महाराष्ट्रात 92 वी रँक मिळवून यश मिळवले. त्यात गणेश यांना आई वडिलांचा आशीर्वाद, पत्नीची भक्कम साथ आणि विशेष करून भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य सर्व स्टाफचे मोलाचे सहकार्य मिळाले.

स.पो. नि.चंद्रसेन पालकर, पो. ऊ. नि. गणेश वाघमारे, कजगाव बिटचे अमलदार स.फौ. छबुलाल नागरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल जिजाबराव पवार, पो.ना. नरेंद्र विसपुते, पो.कॉ. प्रकाश गवळी, पो.कॉ. रवींद्र पाटील तसेच हजेरी मेजर पो. हवलदार हिरालाल पाटील, पोलिस हवालदार राजीव सोनवणे यांचे सहकार्य लाभले. पी. एस.आय. पदी गणेश कुमावत यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे