घोडदे येथे अवैध वाळूचा ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भडगाव शहरातील जूने पिंपळगांव रस्त्यावरील घोडदे येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणारा ट्रॅक्टर महसुल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला असून ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आला आहे.

सदर कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ९ रोजी मौजे घोडदे परिसरात करण्यात आली. अवैध वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पकडून वाळू एक ब्रास, ट्रॅक्टर, ट्रॉली इ. मुद्देमालासह पकडून कारवाई यशस्वी करण्यात आली.

ही करवाई ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लूळे, निखिल बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश अहिरे, महसूल सेवक समाधान माळी आदींनी केली. सदर भडगाव तालुक्यातून होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईचा बडगा हा सुरूच राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.