भडगाव महसूल विभाग पथकाचे काम कसे

0

भडगाव महसूल विभाग पथकाचे काम कसे

“ज्यांच्या डंपर ने दिले त्यांना जाऊ दिले!”
“ज्यांनी नाही दिले त्यांचे तहसिल कार्यालय लावून दिले”!!

पथकातील एका मंडळाधिकारीचा पराक्रम दि.१६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडलेली घटना बनली तहसील कार्यालय प्रांगणात चर्चेचा विषय

भडगाव-प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातून व शहरातून गिरणा नदी पात्रात बेसुमार चोरी करून आणलेली अवैध वाळू वाहतूक सुरूच आहे. यावर भडगाव महसूल विभागाच्या विविध पथकांद्वारे कारवाई करण्यात येते. पथकातील काही कर्मचारी हे वाहन पकडल्यावर तात्काळ तहसील कार्यालयाला जमा करते व आपले कर्तव्य पार पाडते. परंतु दिनांक 16 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान पथकातील मुख्य मंडळाधिकाऱ्याने भडगाव विश्रामगृह समोर एक डंपर थांबविले त्या डंपर चालकाला हे डंपर कोणाचे आहे असे विचारले त्या डंपर चालकाने मालकाचे नाव सांगताच या (या डंपरचे मिळालेले आहे याला सोडा) हे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर तात्काळ सोडण्यात आले. हे विचारत असताना मागून अजून एक अवैध वाळू वाहतुकीचे डंपर आले त्याने या डंपरला व्हरटेक केला व पाचोर्‍या रस्त्याला लागला. या अवैध वाळू वाहतुकीच्या डंपर पथकातील कर्मचाऱ्यांची नजर होती. हे डंपर इथे न थांबता त्याला पुढे थांबवू या इराद्याने ते डंपर ग्रामीण रुग्णालय जवळ जाऊ दिले व त्या ठिकाणी थांबविले व त्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वरील चालकास विचारले व (याचे मिळाले नाही हे जमा करा) ते डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. हे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर जमा केले हे कौतुकास्पदच आहे.(ते डंपर कोणाचेही असो जमा जर केले तर त्याचे कौतुकच आहे) परंतु पाच मिनिटात अगोदर सापडलेल्या रेस्ट हाऊस समोर येईल डंपर सोडले त्याचे काय ?? ते डंपर कोणाचे होते ?? हे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सोडवण्याचे प्रयोजन काय ?? का जे पाच मिनिटानंतर सापडलेले डंपर जमा होऊ शकते मग पाच मिनिटात अगोदर जमा झालेले डंपर का जमा होऊ शकत नाही?? याबाबत दि.१६ रोजी पथकातील तो मंडळाधिकारी कोण?? याची सखोल चौकशी होणार का?? सोडलेले अवैध वाळू वाहतुकीचे डंपर तहसील कार्यालयात जमा होणार का? त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार का? ते जर पळून गेले असेल तर त्याच्यावर तो मंडळाधिकारी गुन्हा दाखल करणार का? याची सखोल चौकशी माननीय तहसीलदार मॅडम यांनी करून भडगाव महसूल ही कुठल्याच वाळू माफिया ला सोडत नाही याची प्रचिती द्यावी.
तसेच यावेळी ज्याची पथकामधून हकालपट्टी केलेली आहे असाही एक तलाठी यामध्ये हजर होता. याची सुद्धा चौकशी व्हावी अशी चर्चा भडगाव तहसीलच्या प्रांगणात सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.