भडगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील वाक येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करतांना एक ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने सकाळी ७.३० वाजता कारवाई केली. अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर भडगाव तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आले आहे.
यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी ग्राम महसूल अधिकारी प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी यांनी दैनिक लोकशाहीशी बोलताना दिली.
ही कारवाई तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील महादू कोळी, गितेश महाजन, प्रशांत कुंभारे, एम जे खाटीक, अभिमन्यू वारे आदींनी केली.
यावेळी पथक हे खाजगी गाडीत रात्री गस्तीवर असताना भडगाव येथून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपरचा पाठलाग करत होते. परंतु ते त्या डंपरला थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला परंतु त्यावरील चालक हा रस्त्याची व वाहतुकीची परवा न करता सुसाट पारोळ्याच्या दिशेने अवैध वाळू वाहतुकीचे डंपर घेऊन फरार झाला. हे डंपर पळाले जरी असले तरी त्यावर येत्या काही दिवसात कारवाई नक्की होणार आहे.
तसेच गिरणा नदी पत्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असे, यावेळी महसूल विभागांना माहिती देण्यात आली.