अखेर भडगाव ते वाडे बससेवा सुरु

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव ते वाडे, जळगाव ते वाडे मुक्कामी या बंद बस फेऱ्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात. याबाबत वेळोवेळी मागण्या करुनही पाचोरा व भडगाव बसस्थानक प्रमुखांचे दुर्लक्ष झाल्याने भडगाव तहसिल कार्यालयासमोर भडगावचे पञकार अशोक परदेशी यांनी ग्रामस्थांसह दि. ७ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजेपासुन आमरण उपोषण सुरु केले होते.  पाचोरा आगार प्रमुखांनी आमरण  उपोषणाची व मागणीची तात्काळ दखल घेतली.

पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागुल यांनी लेखी आश्वासन दिले. तसेच यावेळी निवाशी नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी लिंबु शरबत देउन पञकार व समाजसेवक अशोक परदेशी यांचे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश वाघमारे, पाचोरा आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक जाधव, भडगाव वाहतुक नियंञक एस ए संदानशिव, ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन,  शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष ईम्रानअली सैय्यद, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष रवि अहिरे, शिवसेना माजी शहर प्रमुख मनोहर चौधरी, राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, निंभोरा सरपंच दिलीप पाटील, आर पी आयचे अध्यक्ष आण्णा मोरे, बोदर्डे येथील सोमनाथ पाटील, तांदुळवाडीचे शिवाजी पाटील,  गसचे माजी संचालक सुनिल पाटील, कनाशी देव्हारीचे दिपक पाटील,  वाडे येथील जगदीश गोमलाडु, राजु गोमलाडु, शशिकांत महाजन, रविंद्र परदेशी, एल ओ चौधरी, भाजपाचे शुमभ सुराणा, कोठली रविंद्र पाटील, पञकार रफिक शेख, दस नंबरी, रोहन परदेशी यांचेसह नागरीक हजर होते.

तसेच उपोषण स्थळी भाजपा माजी  सैनिक संघटना तालुकाध्यक्ष समाधान पाटील, माजी जि प सदस्य श्रावण लिंडायत,  प्रहारचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार भोसले, अपंग आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र परदेशी, भाजपाचे शहर प्रमुख बन्सीलाल परदेशी, माजी नगर सेवक नथ्थु अहिरे, गोंडगावचे सेवानिवृत्त सैनिक विजय साळुंखे, गोंडगाव गोविंदा मांडोळे, ॅड भरत ठाकरे,  गोंडगावचे आनंदा पाटील, स्वप्नील सोनवणे, किशोर परदेशी सावदे, बांबरुड प्र ब चे रतन परदेशी, पंडीत माळी नावरे,  घुसर्डीचे रायचंद परदेशी, बोदर्डे येथील सोमनाथ पाटील, कनाशी अशोक पाटील,  ओमप्रसाद पाटील वडगाव, वाडे डाॅ. दिवाकर पाटील,  शरद महाजन, आनंद मोरे,  प्रल्हाद मोरे, परदेशी राजपुत समाज भडगाव तालुकाध्यक्ष हरी परदेशी, गोविंद परदेशी जंगीपुरा, जिल्हा काॅग्रेसचे सरचिटणीस याकुबखान पठाण, गोंडगावचे परमेश्वर मोरे, कजगावचे निकम, विक्रम सोनवणे, आत्माराम पाटील निंभोरा, निंभोरा पोलीस पाटील शरद पाटील,  दत्तु पाटील कोठली यांचेसह नागरीक, सर्वपक्षीय पदाधिकारी, संघटनेचे पदाधिकारी हजर होते.

यावेळी पाचोरा नंदुरबार या बसला शिंदखेडा तालुक्यातील मेथी तसेच परिसरातील गावात बरेच प्रवासी पाचोरा भडगाव येथून ये – जा करता यासाठी त्यांना चीमठाणे नाहीतर दोंडाईचा येथे उतरावे लागते व तेथून मेथी या गावी जावे लागते यामुळे प्रवाशांचे हाल होतात. यामुळे पाचोरा नंदुरबार या बसला मेथी या गावी थांबा मिळवा असे निवेदन ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन यांनी पाचोरा आगार प्रमुख निलिमा बागुल यांना दिले. यावेळी अशोक परदेशी, आण्णा मोरे, नरेंद्र पाटील यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.