भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरासाठी १३३ कोटी २७ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली आहे. आ.किशोर पाटील यांचे प्रयत्न व निधीतुन या योजनेचे कामे सुरु आहेत. या योजनेच्या कामांची पाहणी दि. १७ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पाचोरा भडगाव आमदार किशोर पाटील यांनी भेट दिली.
भडगाव नगर परिषदेच्या अमृत 2.0 अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना व गिरणा नदीवरील बंधारा या कामास भेट देऊन पाहणी केली. त्यांनी गिरणा नदीवरील केटी वेअर पद्धतीच्या बंधार्या च्या काम व प्रगती बाबत माहिती घेतली. तसेच जॅकवेल, डब्ल्यूटीपी, MBR इत्यादी कामांना भेटी देऊन सर्व कामे मुदतीत पूर्ण करणे बाबत सूचना दिल्या.
यावेळी लक्ष्मी कन्स्ट्रक्शन पाचोराचे संजय कुमावत व त्यांची टीम, नगरपरिषद पाणीपुरवठा अभियंता गणेश लाड व भैयासाहेब पाटील, महाराष्ट्र जीवन प्रधिकरणचे अभियंता झाडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.