भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी विदयार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी सबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे, तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
याबाबत उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक /२०२५/प्र.क्र.३४/ई-८दिनांक- २५ मार्च २०२५ नुसार आदेशित केलेले आहे. त्या अनुषंगाने पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते व भुषण अहिरे, उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत भडगांव मंडळाचा दि. १९/०५/२०२५ रोजी दु.१.०० वाजता छत्रपती संभाजी महाराज हॉल, बाळद रोड, भडगांव येथे समाधान शिबिराचे होणार आहे.
सदर शिबिरात तालुक्यातील विविध कार्यालयामार्फत स्टॉल लावण्यात येणार आहेत. या शिबिरात सर्व सबंधित विभागातील योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना ७/१२ उतारे, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, डोमासाईल, अॅग्रिस्टॅक, ईकेवायसी (अनुदान), घरकुल लाभार्थी व इतर लाभाचे वितरण आमदार किशोर पाटील, पाचोरा – भडगाव यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

