भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

भडगाव नगरपरिषदेच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत अंदाजे पाच कोटी रुपयांचे विविध २५ विकास कामाचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा दि.१० रोजी आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण व उद्घाटन आ . किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपरिषद चौक भडगाव येथे नगरपरिषदेकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे होते.
भडगाव नगर परिषद तर्फे शहरात योजनेअंतर्गत कामे
१)भडगाव न.प.हदीतील प्रभात व्यायाम शाळेजवळ भव्य विठ्ठल मूर्ती.
२)गिरणा मॉल जवळ चौक सुशोभिकरण.
३)बडेसर कॉम्प्लेक्स पाचोरा/ चाळीसगाव रोड.
४)अंजली हॉस्पिटल जवळ चौक सुशोभिकरण.
५) नाना डेअरी जवळ चौक सुशोभिकरण.
६)सुर्यवशी डेअरी जवळ चौक सुशोभिकरण.
७)आकाश मॉल जवळ चौक सुशोभिकरण
८)जुना पारोळा रोड भवानी मंदिर जवळ चौक सुशोभिकरण,
९)गिरणा पुलाजवळ जवळ चौक सुशोभिकरण.
१०) नगरपरिबद इमारती जवळ चौक सुशोभिकरण
११)आझाद चौक/ चावडी जवळ चौक सुशोभिकरण
तसेच
१) बचत गटासाठी नगरपरिषद तर्फे आझाद चौक येथे शहरी उपजिविका केंद्र स्थापन करण्यात आले.
२) AI टेक्नॉलॉजी च्या आधारे नागरिकांच्या सोयीसाठी भडगाव नगरपरिषद चॅटबॉट चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
३)भडगाव नगरपरिषद विद्युत विभागांतर्गत जुन्या घंटागाडी चे रूपांतर स्कायलिफ्ट तयार करण्यात आले.
४)शहरातील दिव्यांग व्यक्तिंना निधीवाटप केले.वरील सर्व कामांचे उद्घाटन आ.किशोर धनसिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नगर विकास विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आमदारांच्या हस्ते. मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक विभागात क्रिडा रस्सीखेच स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने भडगाव नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला भडगाव शहरातील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, व्यापारी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच भडगांव शहरातील नागरिक उपस्थित होते.

