भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार भडगाव यांचे अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले. आज दिनांक २१/४/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृह, भडगाव येथे भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार भडगाव यांचे अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले.
तसेच त्याच दिवशी दुपारी ४ वाजता मा. उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे अध्यक्षतेखाली भडगाव तालुक्यातील संपूर्ण ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आली. भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले.
अनुसूचीत जाती
ग्रामपंचायतींचे नाव
घुसर्डी खुर्द (महिला),मांडकी (महिला),
भातखंडे बु.,जुवाडी (महिला),
आमडदे,पिंपळगांव बु.,
अनुसूचीत जमाती
ग्रामपंचायतींचे नाव
पिंप्रीहाट (महिला),कजगांव (महिला),लोण प्र.ब.,मळगाव (महिला),महिंदळे (महिला),
शिवणी,शिदी,गुढे,
नागरीकांचा मागास प्रवर्ग
ग्रामपंचायतींचे नाव
गिरड (महिला),पिचर्ड
अंजनविहीरे,वडगांव बु (महिला),
अंतुली बु,वडजी (महिला),
खेडगांव खुर्द, वाडे (महिला),
कोळगांव,,बात्सर (महिला)
सर्वसाधारण (खुला)
ग्रामपंचायतींचे नाव
पथराड (महिला),
बाळद खुर्द,लोण प्र.ऊ. (महिला),
पळासखेडे (महिला),
भोरटेक बु,,वाक (महिला)
आडळसे (महिला),
सावदे,
बोरनार (महिला),आंचळगांव
निभोरा,
पासडी (महिला),
वडगांव नालबंदी,गोंडगांव (महिला),वरखेड (महिला),
वलवाडी बु.,कनाशी,
बांबरुड प्र.ऊ,बोदडे,,तांदुळवाडी (महिला),भट्टगाव,,बांबरूड प्र.ब.पांढरद (महिला),पिंपरखेड (महिला),कोठली (महिला), आदींची आरक्षण सोडत आज भडगाव येथे काढण्यात आलेली आहे. यावेळी प्रांताधिकारी भूषण अहिरे तहसीलदार शितल सोलाट, नायब तहसीलदार रमेश देवकर, नायब तहसीलदार सोनवणे ,गटविकास अधिकारी के.बी. अंजने, महसूल लिपिक महादू कोळी आदींसह कर्मचारी उपस्थित होते.