स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट चषकचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन

0

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क

संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना उस्तुकता असणाऱ्या स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 या प्रथम पर्वाला दि.19 रोजी सुरुवात होणार आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते होणार असून ही प्रीमियर लीग भडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड येथे होणार आहे.

दि.19 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. तरी सर्व क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन स्व. बापूजी फाउंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांनी केले असून या प्रीमियर लीगमध्ये प्रथम, द्वितीय, उत्तेजनार्थ यांना आकर्षक बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.