भडगाव येथे जागतिक ग्राहक दिन साजरा
भडगाव प्रतिनिधी
भडगाव तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम भडगाव तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
प्रमुख अतिथी प्रा.सुरेश कोळी होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात शासन आदेशा नुसार लोकगीत व पथनाट्रय यांचा समावेश करण्यात आला. शाहीर परमेश्वर सुर्यवंशी व त्याची टिम यांनी “शास्वत जिवन शैली कडे न्याय संक्रमण ” या यंदाच्या थिम वर व ई.के.वाय सी या दोन बाबीवर पथनाट्रय सादर करुन उपस्थितांना मंत्रमुक्त केले यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष अनिल देशमुख (पाचोरा ) यांनी शास्वत जीवनशैली संबंधी विविध उदाहरणं देत या विषयां वर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास पुरवठा निरीक्षक डी व्ही. अमृतकार, गोदाम व्यवस्थापक एस. एस. गढरी पुरवठा लिपीक एस. आर. पाटील व एम. एस. निकम, चेतन पाटील,अखिल भारतीय ग्राहक संस्था जिल्हाध्यक्ष अनिलजी देशमुख , गिरीश दुसाने, सुधाकर पाटील अखील भारतीय ग्राहक पंचायतचे भडगाव तालुका अध्यक्षसुरेश रोकडे, प्रा सुरेश कोळी, दिनेश पाटील, आकाश पाटील, निलेश बडगुजर, गणेश अहिरे,रास्त भाव दुकानदार संघटनेचे जयवंत पाटील व मोठ्रया संख्येने रेशनदुकानदार व नागरीक व अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य, पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आभार डी. व्ही. अमृतकार यांनी मानले.