भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क
अवैध वाळू वाहतुकीची ‘हवा’ काढत तब्बल शंभरीपार वाहनांवर कारवाई करुन नाशिक विभागात भडगाव महसूलने आपला डंका पिटला आहे. तहसीलदार शितल सोलाट यांच्या बेधडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून आगामी काळातही अशीच कारवाई होईल अशी अपेक्षा देखील तालुकावासीय व्यक्त करीत आहेत.

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात ‘हम भी कुछ कम नही’ याप्रमाणे श्रीमती सोलाट यांचे कार्य उजळून निघाले आहे. शितल सोलाट यांची भडगावी तहसीलदार म्हणून दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी नियुक्ती झाली. त्यांनी विधानसभा निवडणुकीतही यंत्रणेला सोबत घेत सर्वत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. अवैध गौण खनिज चोरी रोखण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून रात्री-बेरात्री अवैध वाहतूक रोखण्यासाठी पथकांची निर्मिती करुन बेधडक कारवाईचा बडगा उभारला जात आहे. अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या तब्बल शंगर वाहनांवर कारवाई चा बडगा उगारत दंडात्मक वसुली देखील केली आहे. सर्वसामान्य जनतेचे छोटे-मोठे प्रश्न सोडविण्यासाठी त्या अग्रेसर असतात.
वस्त्रहरणाविरुद्ध वज्रमुठ
गिरणा नदी पात्रातून होणाऱ्या वाळुरुपी वस्त्रहरण रोखण्यासाठी सुरुवातीपासून वज्रमुठ बांधली असून कार्यवाहींची मालिका सुरुच आहे. गिरणामाईचे वस्त्रहरण रोखण्यासाठी अवैध गौण खनिज वाहतुक व वाळू चोरी रोखण्यासाठी कारवार्इचा बडगा सुरुच आहे. गिरणा नदीचे वाळूच्या माध्यमातून लचके तोडणाऱ्या तस्कारांवर कठोर कारवाई सुरु असल्याने तालुकावासी समाधान व्यक्त करीत आहेत.


