भडगाव तहसीलच्या प्रांगणातच तलाठी व वाळू व्यवसायिकामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की

0

भडगाव तहसीलच्या प्रांगणातच तलाठी व वाळू व्यवसायिकामध्ये बाचाबाची व धक्काबुक्की

दोघांची मध्यस्थी घडवणारा तो पोलीस कर्मचारी कोण ?

भडगाव प्रतिनिधी

भडगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक चार रोजी सायंकाळी साडेआठ वाजे दरम्यान भडगाव तहसील कार्यालयात तलाठी असलेल्या व वाळूमाफिया यांच्यात तहसील कार्यालय प्रांगणात आर्थिक कारणावरून बाचाबाची व धक्काबुक्की झाल्याची घटना घडली असून यानंतर बघायची गर्दी जमा झाली होती. या गोष्टीची वाचता न फुटावी म्हणून तलाठी व वाळूमाफियाने “तेरी भी चूप और मेरी भी चूप” असे म्हणून दोघांनी एकमेकांचे पाय पडून विषय संपवण्याची खमंग चर्चा भडगाव तहसील कार्यालयाच्या आवारात सुरू असून तो तलाठी व तो वाळू माफिया कोण ? याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी गेलेला तो भडगाव पोलीस स्टेशन चा कर्मचारी कोण ?? या पोलिसाबाबत सुद्धा उलट सुलट चर्चा आहे. सदर प्रकार हा देवाण-घेवाण वरून घडल्याची चर्चा आहे. सदर कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याला एक प्रोटोकॉल म्हणजेच आचरणाचे बंधन असते ते या प्रकरणांमध्ये कुठेही आढळत नसून यावर मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांताधिकारी, मा.तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.